‘नागरी सेवेतील महाराष्ट्र’ या विषयावर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्यातून प्रथम आलेल्या मृणाली जोशी यांची मुलाखत

मुंबई, दि. 8 :

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण आणि राज्यातून प्रथम आलेल्या मृणाली जोशी यांची नागरी सेवेतील महाराष्ट्र या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एअर या ॲपवर सोमवार, दि. 11 ऑक्टोबर आणि मंगळवार दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.  निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

यंदाच्या नागरी सेवा परीक्षेत मृणाली जोशी यांनी देशात 36 वा तर राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. आपण स्पर्धा परीक्षेची तयारी नेमकी कशी केली, कोचिंग क्लास हा यशस्वी होण्यासाठी किती फायदेशीर, कुठल्या पुस्तकांचा वापर अभ्यासासाठी आपण केला,  राज्यात राहून या परीक्षेची तयारी होऊ शकते का, इंग्रजी हा घटक युपीएससीसाठी किती महत्त्वपूर्ण आहे, आपण मुलाखतीची तयारी नेमकी कशी केली,  मुलाखतीचा अनुभव, युपीएससीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्‍या परीक्षार्थींना केलेले आवाहन आदी विषयांची सविस्तर माहिती श्रीमती जोशी यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!