रावेर तालुक्यातील कुसुंबा युवासेना विभाग प्रमुख व सहस्त्रलिंग येथील काँग्रेस समर्थक युवकांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश.
खानापूर प्रतिनिधी : (उमाकांत मराठे)
दि.०८ रावेर तालुक्यातील कुसुंबा येथील युवासेना विभाग प्रमुख महेंद्र बोरनारे व सहस्त्रालिंग येथील काँग्रेस समर्थक गफ्फार तडवी व आमिन तडवी या युवकांनी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या कार्याने प्रभावित होऊन तसेच
उ.म.प्रमुख श्री.अनिल भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज रोजी रावेर येथे युवा जिल्हा प्रमुख अविनाश भाऊ पाटील,तालुका प्रमुख पिंटुभाऊ धांडे व तालुका युवा प्रमुख योगेश निकम यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला यावेळी प्रहार सेवक राजू भाऊ पाटील, लतिफ भाई, तय्युब तडवी, जाबिर शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.