मध्यप्रदेशमध्ये पोटनिवडणुकीच्या आधी काँग-ेसमध्ये अंर्तकलह, अरुण यादवानी उघडली आघाडी
भोपाळ,
मध्यप्रदेशातील खंडवा लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक लढविण्यास नकार देणारे माजी केंद्रिय मंत्री अरुण यादव यांनी काँग-ेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात मोर्चा उघडला असून त्यांनी लखीमपूर खीरीतील घटनेचा उल्लेख करत प्रश्न केला की जे लोक गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत आहेत ते सध्या कोठे आहेत.
उत्तर प्रदेशातील लखीमरपुर खीरीमध्ये शेतकर्यांच्या हत्येवरुन काँग-ेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि राहुल गांधीनी उघडपणे आपला विरोध नोंदविला आणि पीडितांच्या कुटुंबाना भेटण्यासाठी पोहचले. या दरम्यान काँग-ेसमधील कथीत जी-23 समूहाशी संबंधीत नेते मैदानात दिसूनही न आल्याने यावर माजी मंत्री अरुण यादव यांनी कठोर टिपणी केली आहे. याच बरोबर त्यांनी स्पष्ट केले की मी राहुल व प्रियंकाच्या प्रत्येक संघर्षात बरोबर आहे.
यादव यांनी टिवीट केले की जे लोक बोलत आहेत की गांधी कुटुंबानेच काँग-ेसचे नेतृत्व कशामुळे केले पाहिजे तर या सर्व लोकांनी डोळे उघडे ठेवू पहावे की ज्यावेळी संघर्षाची वेळ येते त्यावेळी राहुल गांधी व प्रियंका गांधीच रस्त्यावर सर्वांत पुढे दिसून येतात.
अरुण यादव हे राहुल गांधींंच्या जवळच्यांपैकी एक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी पुढे म्हटले की प्रियंका गांधी शहिद शेतकर्यांच्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी तीन दिवस उत्तर प्रदेश सरकारच्या कैदेमध्ये राहिल्या आणि ज्या प्रकारे राहुल -प्रियंकाने हाथरस्य-लखीमपुर खीरीची लढाई लढली आहे हे अशा सर्वांसाठी करारी उत्तर होते जे बोल होते की गांधी कुटुंबानेच काँग-ेसचे नेतृत्व कशामुळे करावे.
त्यांनी पुढे म्हटले की हे शेतकर्यांच्या मान सन्मानासाठी युध्द होते आणि ज्याना राहुल-प्रियंकांच्या नेतृत्वाची अडचण होती ते या रणभूमीत कोठे आहेत.
खंडवा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक लढविण्यास नकार दिल्याने चर्चेत आलेले अरुण यादव यांनी आता दिल्ली पासून ते राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेत्यांना यादीत सामिल करुन त्यांच्यावर एकाचवेळी हल्लाबोल करत आहेत.
जाणकारांच्या मते यादवांना पक्षातील काही मोठया नेत्यानी षडयंत्र रचून निवडणुक लढविण्या पासून रोखण्याचा प्रयत्न केला तर स्वत: यादव यांनी निवडणुक न लढण्याची घोषणा करुन अशा नेत्यांना राजकिय डाव खेळून करारी उत्तर दिले आहे