अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन; बॉम्ब शोधक पथकाकडून परिसराची तपासणी
कोल्हापूर,
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्याची घटना समोर आली आहे. गोवा-पणजी कंट्रोल रूमला अज्ञाताने फोन करून बॉम्ब ठेवल्याबाबत फोन केल्याने अंबाबाई मंदिरासह सर्वत्र एकच खळबळ माजली. शिवाय भाविकांसाठी मंदिर सुद्धा प्रशासनाने तात्काळ बंद करून बॉम्ब शोध पथकाकडून मंदिर परिसराची तपासणी करण्यात आली.
दरम्यान, हा निनावी फोन ट्रेसिंगचे काम सुरू असून हा केवळ फेक कॉल असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी म्हटले आहे. पोलिसांनी संपूर्ण मंदिर परिसराची तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नाही. त्यानंतर मंदिरात भाविकांच्या दर्शनाची पुन्हा सोय करण्यात आली. घटस्थापना आणि नवरात्रा निमित्य मोठी गर्दी मंदिरात होत असते. या पार्शवभूमीवर अगोदरपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात होता.