जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी मोबाइल व श्रवण यंत्र वाटप
त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी – ( पांडुरंग दोंदे )
महाराष्ट्र समाजसेवा संघ संचलित श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय नाशिक या विद्यालयात कर्णबधीर दिनाच्या अनुशंगाने डॉ.आनंद सावजी यांनी आपल्या वडीलांच्या स्मृतिप्रित्यर्थ्य मोबाईल फोन व श्रवण यंत्र शाळेत सप्रेम भेट दिले.
मोबाईल फोन व श्रवण यंत्र वाटपाच्या कार्यक्रमास राष्ट्रीय हरित सेनेचे जिल्हा समन्वयक प्रदीपसिंह पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कर्णबधीर विद्यार्थ्यांना मोबाईल फोन श्रवण यंत्र या साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी भाषा शिक्षण महत्वाचे असल्याने शालेय व विभागीय स्तरावर भाषा व आकलन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक व सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वयानुरुप वर्गा वर्गातून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या स्पर्धा ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. अशी माहिती या शाळेचे मुख्याध्यापक पाटील यांनी दिली.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे, उपाध्यक्ष विजय डोंगरे, सचिव सुधाकर साळी, सहसचिव शांताराम अहिरे , कोषाध्यक्ष निरंजन ओक, व सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर, सहकारी, पालक, उपस्थित होते.