लखीमपूर घटनेचा निषेध, महाविकास आघाडी सरकारने पुकारला 11 तारखेला महाराष्ट्र बंद

मुंबई,

उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये शेतकर्‍यांना चिरडून ठार मारल्याच्या घटनेमुळे देशभरात तीव- संताप व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडी सरकारनेही या घटनेचा निषेध म्हणून 11 तारखेला महाराष्ट्र बंदपुकारला आहे. अत्यावश्यक सेवा सोडून हा बंद असणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या वतीने शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.

’लखीमपूरची घटना अत्यंत गंभीर आहे. एका मंत्र्यांचा मुलाने शेतकर्‍यांच्या अंगावर गाडी घालून ठार मारले आहे. यात त्याचा सहभाग दिसून येत आहे. शेतकर्‍यांना चिरडून मारणं असं कुठेही सरकारनं केलं नाही जे उत्तर प्रदेशात भाजप सरकारनं केलं आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

’या घटनेचा निषेध म्हणून आम्ही 11 ऑॅक्टोबरला राज्यात बंद पुकारत आहोत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल चर्चा झाली असून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे’, असंही पाटील यांनी सांगितलं.

’ शेतकर्‍यांवर अस्मानी संकट कोसळलं असताना हे कृत्य करण्यात आलं आहे. शेतकर्‍यांच्या या आंदोलनात आतापार्यंत 500 पेक्षा अधिक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. भाजपची समाजकंटकाबाबतची ही भूमिका स्पष्ट करणारी आहे. जनरल डायर च आठवण करणार हे कृत्य आहे’ अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

क्रुझवर जी काही कारवाई झाली त्यानंतर आरोपींना घेऊन ते जातात, हम्ं पेक्षा त्यांचा रोल जास्त आहे असं दिसतं आहे. मुंबईतून हे ंदत्त्ब्ैदद् दुसरीकडे जावं यासाठी हा प्रयत्न आहे. एनसिबी ला माहिती दिली तर ते पकडणार ना. तू कोण पकडणार? केंद्रीय तपास यंत्रणेचा हा दुरुपयोग होत आहे, अशी टीकाही एकनाथ शिंदेंनी केली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!