देवेंद्र फडणवीस यांचा गुरुवारी 8 लाख भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद

मुंबई,

माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उद्या 7 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या राज्यभरातील शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व बूथ समिती सदस्य म्हणून काम करणार्‍या सुमारे 8 लाख कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

श्री. उपाध्ये यांनी पत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक रचना अधिक बळकट करण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील बूथ समित्यांची, शक्ती केंद्रांची रचना पूर्ण केली जात आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे सध्या समर्थ बूथ अभियान व सेवा – समर्पण अभियानानिमित्त राज्यभर वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. या पार्श्वभूमीवर श्री. फडणवीस हे शक्ती केंद्र व बूथ समिती प्रमुख तसेच बूथ समिती सदस्य म्हणून कार्यरत असणार्‍या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पक्षाच्या संघटनात्मक कार्यक्रमांचा आढावाही श्री. फडणवीस यावेळी घेणार आहेत.

एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्याने एकाच वेळी 8 लाख कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा विक्रम या संवादाच्या माध्यमातून प्रस्थापित होणार आहे, असे श्री. उपाध्ये यांनी पत्रकात नमूद केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!