यूनिटेकच्या माजी प्रमोटरा बरोबर साठगाठ केल्याने तिहार जेल अधिकार्यांना निलंबीत करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
नवी दिल्ली
युनिटेकचे माजी प्रमोटर संजय चंद्रा आणि अजय चंद्रा बरोबर मिलीभगतच्या आरोपानंतर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनवाईनंतर तिहार जेल अधिकार्यांच्या विरोधात पूर्ण तपास आणि तत्काळ निलंबन करण्याचा आदेश दिला.
सर्वोच्च न्यायालयाचे हे निर्देश जेलमध्येच यूनिटेकच्या माजी प्रमोटर (प्रवर्तक) ना गुप्त पध्दतीने आपले कार्यालय सुरु करण्याची सुविधा देण्याच्या आरोपा नंतर समोर आले आहे.
युनिटेकचे माजी निदेशक संजय चंद्रा आणि अजय चंद्रानी तिहार जेलमध्ये राहत असताना कथीतपणे एक गुप्त भूमिगत ऑफिस उघडले होते जेथून ते देवाण घेवाणीसह अनेक काम करत होते.
सर्वोच्च न्यायालयाने 26 ऑगस्टला युनिटेक कंपनीशी संबंधीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चंद्रा बंधूना मुंबईतील जेलेमध्ये वेगवेगळे ठेवण्याचे आदेश दिले होते. तपासामध्ये समोर आलेल्या तथ्यांवर सुनवाई केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यूनिटेकचे माजी प्रवर्तक संजय चंद्रा आणि अजय चंद्राना दिल्लीतील तिहार जेलमधून मुंबईतील ऑर्थर रोड जेल व तलोजा जेलमध्ये पाठविण्याचे आदेश दिले होते. दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाला सूचित केले की जेल अधिकार्यांच्या विरोधात भ-ष्टाचार निवारण अधिनियमशी संबंधीत कलमा अंतर्गत गुन्हेगारी गुन्हा नोंदविला गेला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एम.आर.शाहनी दिल्ली पोलिस प्रमुखांच्या रिपोर्टच्या पार्श्वभूमीवर म्हटले की प्रथमदृष्टया असे वाटत आहे की जेल अधिकार्यांनी आरोपीं बरोबर मिलीभगत केली आहे यामुळे त्यांना निलंबीत केले गेले पाहिजे.
दिल्ली पोलिस प्रमुख राकेश अस्थानाद्वारा आपल्या रिपोर्टमध्ये उल्लेखीत व्यक्ती आणि अज्ञात व्यक्तींच्या विरोधात ज्यांचा उल्लेख करण्यात आला नाही त्यांच्या विरोधात पूर्ण गुन्हेगारी तपासाची परवानगी देण्याची मागणी केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश मंजूर केले.
न्यायालयाने आदेशात म्हटले की आम्ही निर्देश देतोत की तिहार जेल अशा अधिकार्यांना जे प्रथमदृष्टया सहभागी आढळून आले आहेत त्यांना कार्यवाही प्रलंबीत असे पर्यंत निलंबीत केले जावे.
या दरम्यान चंद्रा बंधूंचे प्रतिनिधीत्व करत असलेले वरिष्ठ वकिल विकास सिंहनी सर्वोच्च न्यायालयाकडे आग-ह केला की त्यांना फोरेसिक ऑडिटर ग-ाँट थॉर्नटनचा अहवाल दिला जावा जो आरोपींसाठी आपला बचाव करण्यासाठी आवश्यक आहे.
न्यायालय पीठ आणि वकिल सिंह यांच्यात एक गरमागरम बहस पाहिला मिळाली. सिंहनी सर्वोच्च न्यायालयाकडे प्रकरणात एकतरफा पध्दतीने पुढे न जाण्याचा आग-ह केला आणि म्हटले की त्यांच्या पक्षकाराच्या कुटुंबातील सदस्यांनाही जेलमध्ये टाकले गेले आहे. त्यांना ग-ॉट थॉर्नटन रिपोर्टच्या पार्श्वभूमीच्या विरोधात बचाव करण्याची परवानगी दिली गेली पाहिजे.
न्यायालयाने मात्र रिपोर्ट देण्याच्या सिंहच्या याचिकेला फेटाळले.