लासलगावच्या जगताप कुटुंबियांचा असाही दानशूरपणा-
जि.प सदस्य डी के नाना जगताप व भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुवर्णाताई जगताप यांनी केले स्वखर्चातुन शिधा वाटप.
निफाड प्रतिनिधी-रामभाऊ आवारे
“कठीण समय येता कोण कामास येतो” या उक्तीप्रमाणे लासलगाव परिसरातील कुटुंबांना दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने असंख्य यातना सोसाव्या लागल्या असून अनेक कुटुंबांची घरी उध्वस्त होऊन पुराच्या पाण्यात वाहून गेली त्यामुळे त्यांना मदतीचा हात देणे आपले परमकर्तव्य आहे ही भावना मनी ठेवून सामाजिक बांधिलकी जपत लासलगाव च्या जगताप कुटुंबीयांनी पुढाकार घेत त्या कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे.
मा.ना.केंद्रीय समाज कल्याण मंत्री डॉ.भारतीताई पवार यांचा लासलगाव येथे धावता दौरा झाला त्यावेळी प्रताप सागर (निमगाव वाकडा) येथील बेघर झालेले ३४ कुटुंब यांना लवकरात लवकर पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक सामग्री पुरवावी असे सांगितले होते त्याच निर्देशनानुसार,आज दिनांक ५ ऑक्टोबर रोजी प्रताप सागर जवळील सांडवा फुटून बेघर झालेल्या कुटुंबांना एक हात मदतीचा म्हणून जि प सदस्य डी. के नाना जगताप व सभापती सौ.सुवर्णाताई जगताप यांनी स्वखर्चाने परिसरातील ३४ कुटुंबांना घटनास्थळी जाऊन
शिधा वाटप केले .त्यावेळी मा.प्रांत मॅडम अर्चना पठारे व तहसीलदार घोरपडे साहेब यांच्या निर्देशाने त्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आलेले विंचूर चे सर्कल भाऊसाहेब चंद्रभान पंडित व सोबत कोतवाल सागर म्हस्कर यांनी सर्व बेघर वस्तीवरील नुकसान झालेल्या घराचे पंचनामे केले. त्यावेळी कोणतेही कुटुंब सरकारी योजने पासून वंचित राहू नये असे सौ. सुवर्णाताई जगताप यांनी सर्कल भाऊसाहेब यांना सांगितले तसेच त्यासाठी कुठल्याही प्रकारची गरज पडल्यास आम्ही सदैव प्रयत्न करू असे सुवर्णाताईं जगताप यांनी सांगितले.
यावेळी सौ.सुवर्णाताई जगताप ,निलेश सालकडे, स्मिताताई कुलकर्णी ,ज्योतीताई शिंदे, रूपाताई केदारे, सिंधूताई पाल्हाळ व परिसरातील सर्व बेघर ३४ कुटुंबीय उपस्थित होते.
देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे या न्यायाप्रमाणे आज निमगाव वाकडा (प्रताप सागर) परिसरातील ३४ कुटुंबांना अतिवृष्टीचा फटका बसला होता यासाठी जगताप कुटुंबीय मदतीला देवदूत म्हणून हजर झाले.लासलगाव परिसरात मदतीला धावून येणारे जगताप कुटुंबियांची महाराष्ट्रभर मदत करण्याची खेती असून त्याचा आज प्रत्यक्ष अनुभव आम्हाला आला असून त्यांनी आमच्या समस्या जाणून घेऊन घरपोच शिधावाटप करून आमच्या सर्व कुटुंबांना कृत्य कृत्य केलं त्याबद्दल जगताप कुटुंबियांची सर्व बाधित कुटुंबांच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार.
एक नुकसान ग्रस्त कुटुंब सदस्य.