वस्त्रोद्योग मंत्रालयाने 160 कोटी रुपये खर्चासह सर्वसमावेशक हस्तकला समूह विकास योजना सुरू ठेवायला मंजुरी दिली

नवी दिल्ली,

वस्त्रोद्योग मंत्रालयाने एकूण 160 कोटी रुपये खर्चासह सर्वसमावेशक हस्तकला समूह विकास योजना (ण्प्ण्ए) सुरु ठेवायला मंजुरी दिली आहे. ही योजना मार्च 2026 पर्यंत चालू राहील. या योजनेअंतर्गत हस्तकला कारागिरांना पायाभूत सुविधा, बाजारपेठ, संरचना आणि तंत्रज्ञान उन्नतीकरण सहाय्य प्रदान केले जाईल.

उत्पादन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी स्थानिक कारागीर आणि लघु आणि मध्यम उद्योगांच्या व्यवसाय संबंधी गरजा पूर्ण करणार्‍या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे सर्वसमावेशक हस्तकला समूह विकास योजनेचे (सीएचसीडीएस) उद्दिष्ट आहे. थोडक्यात, या समूहांची स्थापना करण्याचे मुख्य उद्दिष्ट कारागीर आणि उद्योजकांना आधुनिक पायाभूत सुविधा, अद्ययावत तंत्रज्ञान, पुरेसे प्रशिक्षण आणि मनुष्यबळ विकास माहिती, बाजारपेठेशी संबंध आणि उत्पादन विविधतेसह जागतिक दर्जाचे कारखाने उभारण्यास मदत करणे हे आहे.

सीएचसीडीएस अंतर्गत, मूलभूत सर्वेक्षण आणि कामकाजाचे मॅपिंग, कौशल्य प्रशिक्षण, सुधारित टूल किट, विपणन कार्यक्रम, चर्चासत्रे , प्रसिद्धी, संरचना कार्यशाळा, क्षमता निर्मिती सारखे सहाय्य प्रदान केले जाईल. सामायिक सुविधा केंद्रे, एम्पोरिअम्स, कच्चा माल बँका, व्यापार सुविधा केंद्र , सामायिक उत्पादन केंद्र , डिझाईन आणि रिसोर्स सेंटर साठीही मंजुरी दिली जाईल.

या उद्देशाने तयार केलेल्या डीपीआर नुसार आणि आवश्यकतेनुसार हस्तकला क्षेत्राचा चांगला अनुभव असलेली केंद्रीयराज्य हस्तकला महामंडळेस्वायत्त, संस्था-परिषद-संस्थानोंदणीकृत सहकारीकारागीरांची उत्पादक कंपनीनोंदणीकृत एसपीव्ही यांच्या माध्यमातून विकासासाठी एकात्मिक प्रकल्प हाती घेतले जातील.

विखुरलेल्या कारागिरांना एकत्र आणणे, मूलभूत स्तरावर उद्योग उभारणे आणि त्यांना हस्तकला क्षेत्रातील एसएमईशी जोडण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.या योजनेअंतर्गत सर्वांगीण विकासासाठी 10,000 हून अधिक कारागीर असलेल्या मेगा हस्तकला समूहांची निवड केली जाईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!