भारताचा आर्टिफिशियल इंटेलिजेंस बाजार 2025 पर्यंत 7.8 अब्ज डॉलर पर्यंत पोहचेल
नवी दिल्ली,
भारतामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) बाजार 2025 पर्यंत 7.8 अब्ज डॉलर पर्यंत पोहचेल असा खुलासा एका नवीन रिपोर्टमध्ये दिला आहे.
मंगळवारी एका नवीन रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की हे हार्डवेयर, सॉफ्टवेअर आणि सेवा बाजारांना कव्हर करत आणि 20.2 टक्क्यांच्या सीएजीआर (यौगिक वार्षीक वाढ दर ) पेक्षा वाढत आहे.
इंटरनॅशनल डेटा कॉरर्पोरेशन (आयडीसी) नुसार भारतामध्ये व्यवसाय पुढील पाच वर्षासाठी एआय केंद्रित आणि एआय नॉन केंद्रित दोनीही अनुप्रयोगाना स्विकारण्यात गती आणेल.
एआय सॉफ्टवेअर खंड बाजारावर वर्चस्वी होईल आणि 2025 च्या शेवट पर्यंत 18.1 टक्क्यांच्या सीएजीआरपेक्षा 2020 च्या 2.8 अब्ज डॉलरच्या पुढे जाईल.
आयडीसी इंडियाचे असोसिएट रिसर्च डायरेक्टर, क्लाउड अँड एआय, रिशू शर्मानी सांगितले की भारतीय संघटनानी ग-ाहक सेवा, मानव संसाधन (एचआर), आयटी अॅटोमेशन, सुरक्षा, शिफारशी आणि अनेक अन्य कार्यामध्ये उपस्थित व्यावसायीक परिदृश्याना संबोधीत करण्यासाठी एआयमध्ये गुंतवणुक करण्याची योजना बनवली आहे.
शर्माने म्हटले की व्यावसायीक लवचिकता वाढविणे आणि ग-ाहक प्रतिधारणाला वाढविणे भारतीय उद्यमोद्वारा एआयचा उपयोग करण्याच्या शीर्ष व्यावसायीक उद्देशांपैकी एक आहे.
भारतीय संघटनानी आपल्या एआयएमएल समाधांनासाठी क्लाउडला पसंतीच्या परिनियोजना स्थानाच्या रुपात दाखविले आहे. देशात जवळपास 51 टक्के संघटना एआयएमएल समाधानाच्या माध्यमातून देवाण घेवाण संबंधीत आणि सोशल मीडिया डेटाचे प्रसंस्करण करत आहेत.
एआयचे वरिष्ठ बाजार विेषक स्वप्नील शेंडेनी म्हटले की एआयएमएल प्रोजेक्टमध्ये डेटा सर्वांत महत्वपूर्ण घटकांपैकी एक असण्या बरोबरच व्यवसाय रियल टाइम व्यावसायीक निर्णय घेण्यासाठी मोठा डेटा व्हॅल्यूमला संभाळण्यासाठी विविध डेटाबेसचा उपयोग करत आहेत. संघटनाना एआयएमएल मॉडेलसाठी उच्च गुणवत्ता असलेल्या प्रशिक्षण डेटा प्राप्त करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
एआय सॉफ्टवेअर श्रेणीसाठी एआय अॅप्लीकेशन महसूलाचा सर्वांत मोठा भाग आहे जो 2020 मध्ये 52 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की एआय परियोजना अयशस्वी होण्याचे प्रमुख कारणामुळे वर्तमान व्यावसायीक प्रक्रियांमध्ये विघटनकारी परिणाम आणि व्यावसायीक शाखांशी अनुवर्ती कारवाईची कमी सामिल आहे.