सेवा ठप्प पडल्याने फेसबुकच्या कर्मचार्यांना लॉगइन मिळाले नाही
सॅन फ्रॉसिस्को,
फेसबुकच्या इतिहासामध्ये 2008 नंतर सोमवारी सलग सहा तास सेवा ठप्प पडल्याने ही सर्वांत वाईट स्थिती म्हणून ओळखली जात आहे. याच बरोबर फेसबुकचे कर्मचारी व कॉन्ट्रेक्टर्स यांनी तक्रार केली की सोमवारी या अथळ्यामुळे ते आपल्या वर्क अकाउंटसमध्ये लॉगऑन करण्यात असमर्थ होते.
सीएनबीसीच्या बातमीनुसार सोमवारी सहा तास सुरु असलेल्या या आउटेजमुळे कंपनीच्या 3 अब्जपेक्षा अधिक उपयोगकर्त्यांना फेसबुक आणि याच्या इंस्टाग-ाम व व्हॉटसअॅप सेवांचा उपयोग करणे अशक्य झाले तसेच कर्मचार्यांच्या अंतर्गत सिस्टीमला प्रभावित केले.
विशेषपणे कर्मचार्यांनी म्हटले की आउटेज त्यांना माहितीला ट्रॅक करण्यासाठी उपयोग करण्यात येणार्या टूल पर्यंत पोहचण्या पासून रोखत होते. याच बरोबर अंतर्गत चॅट फंक्शन सारख्या सेवांचा उपयोग अनेक लोक करत होते.
बातमीमध्ये सांगण्यात आले की कर्मचार्यांनी नाव न छापण्याची विनंती केली कारण ते अंतर्गत गोपनीय प्रकरणावर चर्चा करत होते.
स्थितीशी परिचित एका व्यक्तीने वृत्तपत्राला सांगितले की आउटेज इतके वाईट होते की ज्या इंजीनियरांना सेवेच्या मुद्दांना सोडविण्यासाठी मदत करण्याचे काम दिले गेले होते ते लॉगऑनही करु शकले नाहीत आणि समस्यांना सोडविण्यात ते सामिल झाले नाहीत.
फेसबुकच्या नागरीक अखंडता टिमचे एक माजी उत्पाद व्यवस्थापक फ्रॉसेस हेगने वॉल स्ट्रिट जर्नलच्या द फेसबुक फाइल्समध्ये सलग बातम्यांच्या मालिकेत सांगितले की अनेक अंतर्गत कागदपत्रांच्या मागे स्वत:ला व्हिसलब्लोअर असल्याचा खुलासा करण्याच्या एक दिवसानंतर आउटेज आले आहे.
इस्टाग-ामच्या एका कर्मचार्याने सीएनबीसला सांगितले की काही कर्मचारी म्हणत होते की नुकत्याच झालेल्या व्हिसलब्लोर परिक्षेसाठी आउटेज होते. कर्मचार्याने म्हटले की ज्याचे जाहिरात अभियान सोमवार पासून सुरु होणार होते अशा कोणत्याही निर्माता किंवा ब-ाँडसाठी आम्हांला वाईट वाटले.