नो बॉल वादावर गावसकारांची तिसर्या पंचावर टिका
नवी दिल्ली,
आयपीएल-2021 च्या दुसर्या फेरीतील 50 वा सामना सोमवारी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळण्यात आला असताना सामन्यात तिसर्या पंचाने वादग-स्त वाइड बॉलवर दिलेल्या निर्णयावर भारतीय संघाचा माजी कर्णधार सुनील गावसकरने टिका केली.
आयपीएलच्या हंगामात सोमवारी खेळण्यात आलेल्या संघर्षपूर्ण सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईला पराभूत करुन गुणतालिकेत पहिले स्थान मिळविले. परंतु शेवटच्या षटकामध्ये तिसर्या ंपचाच्या वादग-स्त निर्णयावर मात्र सुनील गावसकरने कठोर प्रतिक्रिया दिली.
अंतिम षटकामध्ये सहा धावांवाचा बचाव करण्यासाठी डवेन ब-ावो गोलंदाजी करण्यासाठी आला आणि त्याने ऑफ स्टम्पवर वाइड चेंडू टाकला परंतु चेंडू खेळपट्टीवर स्पर्शही झाला नव्हता. यामुळे ऑनफील्डर पंच अनिल चौधरीनी नो बॉलचे संकेत दिले परंतु तिसर्या पंचाशी चर्चा केल्यानंतर याला वाइड बॉल ठरविण्यात आले. मात्र नियमानुसार जर चेंडू स्ट्रइकरच्या खेळपट्टीच्या रेषे पर्यंत पोहचण्याच्या आधी पूर्णपणे किंवा आंशिकपणे खेळपट्टीच्या बाहेर गेला तर पंच नो बॉलचे संकेत देऊ शकतो.
यावरुन गावसकरने स्टार स्पोटर्सला सांगितले की खरे तर हा नो बॉल होता आणि आम्ही टिव्ही पंचाचे काही निर्णय पाहिले आहेत जे या परिस्थितीमध्ये विजय किंवा पराभवामध्ये अंतर निर्माण करु शकते आणि असे झाले नाही पाहिजे. अशा प्रकारच्या निर्णयामुळे खेळ बदला नाही पाहिजे. दिल्लीचा संघ जिंकला ही चांगली गोष्ट आहे कारण यामुळे खेळ बदलू शकला असता.