आयपीएल 2021 : प्ले ऑफ मध्ये पोहोचण्यासाठी फक्त विजय चालणार नाही, चारही टीमना करावं लागणार हे काम

मुंबई,

आयपीएल 2021 आता अखेरच्या आठवड्यात येऊन ठेपलं आहे, पण प्ले-ऑॅफच्या चौथ्या स्थानासाठीची रेस अजूनही कायम आहे. चेन्नई, दिल्ली आणि बँगलोरच्या टीमने आधीच प्ले-ऑॅफ गाठलं आहे, तर कोलकाता, राजस्थान, पंजाब आणि मुंबई यांच्यात चौथ्या स्थानासाठी स्पर्धा आहे. कोलकात्याचे 13 मॅचमध्ये 12 पॉईंटस आहेत, त्यामुळे ते चौथ्या क्रमांकावर आहेत. तर पंजाब, राजस्थान आणि मुंबई 10-10 पॉईंटससह पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत.

मुंबई आणि राजस्थान यांच्यात आज करो या मरोचा मुकाबला होणार आहे, कारण दोन्ही टीमसाठी समिकरण एकसारखं आहे. दोन्ही टीमना प्ले-ऑॅफमध्ये पोहोचण्यासाठी फक्त विजयच गरजेचा नाही, तर मॅचही मोठ्या फरकाने जिंकावी लागणार आहे. तरचं प्ले-ऑॅफमध्ये पोहचण्याची शक्यता निर्माण होईल.

राजस्थानचा नेट रन रेट -0.337 आहे, तर मुंबईचा -0.453 एवढा झाला आहे. 10 पॉईंटसवर असणार्‍या टीममध्ये मुंबईचा नेट रन रेट सगळ्यात खराब आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात खराब कामगिरी केल्यामुळे मुंबईचा रन रेट आणखी खराब झाला. आजचा सामना हरणारी टीम प्ले-ऑॅफच्या रेसमधून बाहेर जाईल, पण विजय मिळवणार्‍या टीमला प्ले-ऑॅफमध्ये जाणं सोपं नसेल, कारण कोलकात्याचा पुढच्या सामन्यात विजय झाला तर ते 14 पॉईंटसपर्यंत जातील, तसंच त्यांचा नेट रन रेट 0.294 एवढा आहे.

राजस्थान आणि मुंबईसाठी पुढचा प्रवास फारच खडतर झाला आहे. कोलकात्याचा पुढचा सामना राजस्थानविरुद्ध आहे, तर मुंबई शेवटची मॅच हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. मुंबईने उरलेले दोन्ही सामने जिंकले आणि राजस्थानने कोलकात्याचा पराभव केला, तर मुंबई 14 पॉईंटसवर राहिल आणि राजस्थान आणि कोलकात्याचे 12 पॉईंटस होतील, या परिस्थितीमध्ये मुंबई प्ले-ऑॅफमध्ये पोहोचू शकते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!