पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी टीम इंडिया सज्ज, हे प्लेइंग 11 उतरणार मैदानात

मुंबई,

टी 20 विश्वचषक 2021 हे 17 ऑॅक्टोबरपासून सुरू होत आहे. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. टी -20 विश्वचषक सामना 24 ऑॅक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाईल. यावर्षी टी -20 विश्वचषक जिंकण्यासाठी आणि पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवण्यासाठी भारताला प्रबळ दावेदार मानले जात आहे. टी -20 विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले, तर भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विक्रम खूप चांगला आहे. टी 20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 5 सामने झाले आहेत, त्यापैकी टीम इंडियाने सर्व म्हणजे पाचही सामने जिंकले आहेत.

टी 20 विश्वचषक खेळताना भारत आपल्या मजबूत प्लेइंग इलेव्हनसह मैदानावर उतरेल. चला तर मग जाणून घेऊया की, भारतविरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात कोणकोणते खेळाडू खेळणार आहेत.

ही सलामीची जोडी असेल

केएल राहुल आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्माला पाकिस्तानविरुद्ध सलामीसाठी संधी दिली जाईल याची खात्री आहे. हे दोन्ही फलंदाज बर्‍याच काळापासून भारतासाठी चांगली कामगिरी करत आहेत.

अशी असेल मीडल ऑॅर्डर

त्याचबरोबर कर्णधार विराट कोहली 3 नंबरसाठी फिट आहे. चौथ्या क्रमांकासाठी कोहली निश्चितपणे स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला स्थान देईल. जर टीम इंडियाचा टॉप ऑॅर्डर या फलंदाजांनी सज्ज असेल, तर नक्कीच पाकिस्तानविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते.

ॠषभ पंत विकेटकिपर

विकेटकिपर आणि फलंदाज ॠषभ पंत मिडल ऑॅर्डमध्ये पाचव्या क्रमांकावर खेळ्यासाठी उतरेल हे निश्चित आहे.

पांड्या आणि जडेजा अष्टपैलू

गोलंदाजी व्यतिरिक्त हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा हे दोघेही उत्तम फलंदाजी करतात. जडेजा आपल्या बॅटींग बरोबरच आपल्या बॉलिंगने सामना फिरवू शकतो आणि तसेच हार्दिक हा अनेकदा गेम चेंजर ठरला आहे.

भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांचा वेगवान गोलंदाजांसाठी या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश असेल. हे तिन्ही गोलंदाज जगातील सर्वात धोकादायक गोलंदाजांपैकी एक आहेत. बुमराहबद्दल बोलायचे झाले तर तो डेथ ओव्हरमध्ये जगातील सर्वात मजबूत गोलंदाज आहे. रविचंद्रन अश्विनला देखील टीममध्ये स्थान देण्यात आले आहे.

पाकिस्तान विरुद्ध खेळणार्‍या प्लेइंग इलेवनची नावं:

विराट कोहली (कर्णधार)

रोहित शर्मा (उपकर्णधार)

केएल राहुल

सूर्यकुमार यादव

ॠषभ पंत (विकेटकीपर)

हार्दिक पांड्या

रवींद्र जडेजा

आर अश्विन

वरुण चक्रवर्ती

जसप्रीत बुमराह

भुवनेश्वर कुमार

भारत आणि पाकिस्तान 2 वर्षांनंतर भिडणार

भारत आणि पाकिस्तानचे संघ 2 वर्षांनंतर आमनेसामने येतील. 2019 च्या विश्वचषकादरम्यान दोन्ही संघ शेवटच्या वेळी एकमेकांसमोर आले होते. त्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला. रोहित शर्माने त्या सामन्यात 140 धावा केल्या. टीम इंडियाने 5 विकेटवर 336 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 6 विकेटवर 212 धावाच करू शकला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी -20 मध्ये एकूण 8 सामने झाले आहेत, त्यापैकी टीम इंडियाने 7 जिंकले आहेत, तर पाकिस्तानने फक्त एक सामना जिंकला आहे. आम्ही तुम्हाला सांगू की, पाकिस्तानने भारतावर शेवटचा विजय 2012 मध्ये जिंकला होता. अशा स्थितीत पाकिस्तानचा संघ 9 वर्षांपासून भारतावर विजय मिळवण्याची तळमळ बाळगून आहे. आयसीसी टी 20 विश्वचषक 2021 यूएईमध्ये 17 ऑॅक्टोबरपासून होणार आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होतील. तर या स्पर्धेचा अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!