आत्म्याची तृप्ती हेच खरे श्राध्द..
( जळगाव ) –
रूढी परंपरेनुसार स्वर्गवासी झालेल्या पितरांना तृप्ती मिळण्यासाठी श्राध्दपक्षात श्राध्द केले जाते. सणवार रूढी परंपरा कुळाचार श्राध्द व्यवस्थित केले तर तुमच सगळ चांगल होणार. अस मनावर बिंबवल जात आणि मग आपण वाईट होवू नये म्हणून ते करत असतो. पण हे कितपत योग्य आहे. कुणी सांगत म्हणून करणे आणि स्वनिर्णय घेऊन करणे यात खूप फरक असतो असे माझे मत आहे. आणि मी मला जे वाटलं तेच केलं.
आज माझ्या सासु सासर्यांची श्राध्द तिथी. माझ्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले म्हणून श्राध्द करता येणार नाही. पण मला हे मान्य नव्हते. का नाही करायचं? म्हणून मी मनाशी ठरवलं. त्यांना ज्ञात नव्हते काय घडले आहे. ते स्वप्नात येऊन जेवण मागायचे म्हणून ठरवले आणि लीलाई बालकाश्रमातील मुलांना जेवण देण्याचे ठरवले आणि आज ते कार्य पुर्ण केले. जेवणात छान वरणभात, पुरीभाजी, खिर, भजे, पापड इ. पदार्थ होते जेवण करून मुले खुप तृप्त झाली. आणि तेच मनाला खुप समाधान मिळाले. मुलांच्या आत्म्याची तृप्ती म्हणजे हीच त्यांच्या मनाची शांती. हेच खरे श्राध्द श्रध्देने केले जाते ते श्राध्द भूकेल्याची भूक भागवणे हेच गरजेचे आहे. आणि तेच मी केले.
सदैव त्यांचे आशिर्वाद माझ्या कुटूंबाच्या पाठीशी असावेत हीच एक विनंती व मागणी…
अलका गोविंद पितृभक्त
जळगाव