ऐनपुर प्राथमिक आरोग्य केन्द्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कार्यतत्परता दाखवत वाचविले प्राण
【सर्पदंश झालेल्या तरुणावर ताबडतोब उपचार करत केले ग्रामीण रुग्णालयात रवाना】
ऐनपुर ता. रावेर- (प्रतीनीधी) -दि.5/10/2021
ऐनपुर येथील तरुणाला सकाळी 10 च्या दरम्यान सर्पदंश झाल्याने त्याला प्राथमिक उपाचारासाठी ऐनपुर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले व प्रथमोपचार करत वैद्यकीय अधिकारी यांनी कार्यतत्परता दाखवित पुढील उपचारासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात रवाना केले.
सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील ऐनपुर येथील 21वर्षीय तरुण हुसेन अजगर पिंजारी याला सकाळी बसस्टेण्ड परिसरात 10च्या दरम्यान सर्प दंश झाल्याने तरुणाला ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेउन गेले असता वैद्यकीय अधिकारी डॉ नीरज पाटील तसेच डॉ संदीप चवरे यांनी कार्यतत्परता दाखवत तरुणाला प्रथमोपचार करुन तात्काळ पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय,रावेर येथे रवाना करत स्वतः डॉ नीरज पाटील हे रुग्णा सोबत ग्रामीण रुग्णालय येथे गेले, सदर तरुणाची प्रकृति धोक्याबाहेर असून रुग्णच्या नातेवाईकानकडुन प्राथमिक आरोग्य केन्द्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ नीरज पाटिल,डॉ संदीप चवरे यांचे आभार मानले तसेच सर्व स्टाफ़चे आभार मानले
तसेच शांतिलाल पाटील,शब्बीर तड़वी साधना, सिस्टर,मयूरभाऊ,केदार भाऊ, व स्टाफ चे आभार मानले.