राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मंडळाच्या स्थापनेसाठी अधिसूचना
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2021
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मंडळाच्या नियमांसह त्याच्या अधिसूचना जाहीर केली आहे. या नियमांद्वारे मंडळासाठी रचनात्मक नियम, मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या पात्रतेचे निकष, निवड प्रक्रिया, पदाचा कार्यकाळ राजीनामा घेणे अथवा निवड करण्याची प्रक्रिया, मंडळाचे अधिकार आणि कार्ये, मंडळाच्या बैठका या विषयीच्या तरतुदी नमूद करण्यात आल्या आहेत.
या मंडळाचे मुख्यालय राष्ट्रीय राजधानी प्रदेशात (दिल्ली) येथे असेल आणि मंडळ भारतातील इतर ठिकाणी कार्यालये स्थापन करू शकेल. त्यात अध्यक्ष आणि कमीत कमी तीन मात्र सात सदस्यांपेक्षा जास्त नसलेले, सदस्य केंद्र सरकारद्वारे नियुक्त केले जातील.
या मंडळावर रस्ता सुरक्षा, नाविन्यपूर्ण आणि सुलभ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी आणि वाहतूक आणि मोटर वाहनांसाठी नियम करण्याची जबाबदारी असेल.
या हेतूसाठी, तसेच पुढे दिलेल्या इतर बाबींसाठी मंडळ जबाबदार असेल
(a) डोंगराळ प्रदेशांतील रस्ता सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन आणि रस्ते बांधणीसाठी विशिष्ट मानके तयार करणे;
(b) वाहतूक पोलीस, हॉस्पिटल प्राधिकरण, महामार्ग प्राधिकरण, शैक्षणिक आणि संशोधन संस्था आणि इतर संस्थांसाठी क्षमता वाढवण्याच्या आणि कौशल्यांच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्त्वे घालून देणे
(c)अपघात समयी सुविधा आणि उपवैद्यकीय सुविधा स्थापन करणे आणि त्यांची कार्यवाही करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे यासाठी
केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्राधिकरणांना रस्ता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी तांत्रिक सल्ला आणि मदत प्रदान करणे;
त्याचप्रमाणे
(a) प्रोत्साहन देणाऱ्या संस्था तयार करणे
(b) रस्ता सुरक्षा आणि रहदारी व्यवस्थापनातील उत्तम कार्यपद्धती विकसित करणे;
(c) वाहन अभियांत्रिकी क्षेत्रात नवीन वाहन तंत्रज्ञानाचा अवलंब;
(d) आंतरराष्ट्रीय संस्थांशी समन्वय; आणि
(e) आंतरराष्ट्रीय तांत्रिक मानके आणि एतद्येशीय तांत्रिक मानकांमधील सुसंगतता राखणे,
रस्ता सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन, जलदगती तपास सुधारण्यासाठी संशोधन करणे इत्यादी विविध कार्यांसाठी जबाबदार असेल.