धक्कादायक! व्यक्तीनं 75 मुलींसोबत केलं लग्न; या विचित्र कामासाठी करायचा वापर
नवी दिल्ली,
बांगलादेशी मुलींची तस्करी करणारा मुनीर उर्फ मुनीरुल यानं मध्य प्रदेशच्या इंदौर पोलिसांजवळ अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आरोपीनी बांगलादेशमधून 200 हून अधिक मुलींना भारतात आणत त्यांना देहविक्रीच्या धंद्यात ढकललं होतं. दर महिन्याला तो 55 हून अधिक मुली आणत असे. 5 वर्षापासून तो या धंद्यात आहे. आरोपीनं आतापर्यंत 75 मुलींसोबत लग्न केलं आहे. गुरुवारी इंदौर एसआ?टीनं मुनीरला सूरतमधून अटक केली.
आरोपी मुलींना बांगलादेश आणि भारताच्या पोरस सीमेवरील नाल्याच्या रस्त्यानं आणत असे आणि एजंटच्या माध्यमातून मुर्शिदाबाद आणि आसपासच्या ग-ामीण भागातून मुलींना भारतात आणत. इंदौर पोलिसांनी 11 महिन्यांआधी लसूडिया आणि विजय नगर परिसरात ऑॅपरेशन चालवत 21 तरुणींची सुटका केली होती. यातील 11 मुली बांगलादेशी होत्या आणि बाकी इतर ठिकाणच्या. या प्रकरणी सागर उर्फ सँडो, आफरीन, आमरीन आणि इतर आरोपींना पकडण्यात आलं होतं. मात्र, मुनीर फरार झाला होता. त्याला गुरुवारी सूरतमधून पकडून इंदौरमध्ये आणण्यात आलं.
मुनीरचा पत्ता सांगणार्याला पोलिसांनी दहा हजार बक्षीस जाहीर केलं होतं. तो बांगलादेशच्या जसोर येथील रहिवासी होता. बहुतेक मुलींसोबत त्यानं लग्न केलं आणि नंतर त्यांना भारतात आणून विकलं. त्याच्या मागे मोठं नेटवर्क होतं. सेक्स रॅकेटशी संबंधित टोळी मुलींना आधी कोलकाता, नंतर मुंबईत प्रशिक्षण देते, अशी माहिती मुनीरकडून मिळाली. यानंतर, मागणीनुसार तो भोपाळ आणि इतर शहरांमध्ये मुलींचा पुरवठा करायचा.
बांगलादेशी मुलींना इथपर्यंत आणण्यामागील जी माहिती समोर आली त्यानुसार, बांगलादेशचे एजंट गरीब कुटुंबातील मुलींना काम मिळवून देण्याच्या बहाण्याने सीमा ओलांडून गुप्तपणे कोलकात्यात आणायचे. येथे त्यांना एका आठवड्यापेक्षा जास्त काळ ठेवण्यात येत. इथे त्यांना देहबोली आणि उत्तम राहण्याचं प्रशिक्षण देण्यात येत. ट्रेंड झाल्यावर मुलींना मुंबईला पाठवण्यात येत असे. इथे पुन्हा प्रशिक्षण देण्यात येत. यानंतर शहरांमधून आलेल्या मागणीनुसार मुलींना त्या शहरांमध्ये पाठवण्यात येत असे.
मुलींना मुंबईहून सोडण्यापूर्वी त्यांची कागदपत्रे काढून घेतली जात असे. मुली बांगलादेशातील आहेत की नाही हे एजंट त्यांच्या डोळ्यांकडे पाहून ओळखत असे. सुरतमधील स्पा सेंटर व्यतिरिक्त ते मुलींना इंदौर, भोपाळ, ग्वाल्हेर, पुणे, मुंबई, बंगळुरू येथेही पाठवत.