लखीमपूर हिंसाचार: संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला विचारले काही प्रश्न

मुंबई,

रविवारी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसाचारानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. आज जे काही उत्तर प्रदेशमध्ये सुरु आहे त्याविरोधात कोणी काही बोलणार आहे की नाही?, असा प्रश्न उपस्थित करत सध्या शेतकर्‍यांविरोधात सुरु असणारी क्रूर वागणूक हे भाजपचे अधिकृत धोरण आहे का?, असा सवाल राऊत यांनी सत्ताधार्‍यांना विचारला आहे. त्याचबरोबर मोदी सरकारची तुलना राऊत यांनी बि-टीश राजवटीशी करताना क्रांतीकारक बाबू गेनू यांचाही उल्लेख केला आहे.

आपल्या भाषणात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्‍यांबद्दल तर फार बोलत असतात, असे सांगत जो प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला तो बाबू गेनू यांच्यावर बि-टीशांनी ट्रक चालवल्याच्या घटनेची आठवण करुन देणारा असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे, ही क्रूर वागणूक आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना का दिली जात आहे?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. शेतकरी देशद्रोही वाटले म्हणून अशी क्रूर कारवाई केली का?, असा प्रश्नही राऊतांनी विचारला आहे.

देशभरातील शेतकर्‍यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संतापाची लाट असल्याचेही राऊत म्हणाले आहेत. तसेच घटनास्थळी विरोधी पक्षातील नेत्यांना जाण्यास बंदी घालण्यात आल्यावरुनही राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तिथे विरोधी पक्षाला जायला बंदी घातली आहे, ही कोणती लोकशाही असल्याचा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.

राजकीय वर्तुळात या घटनेचे तीव- पडसाद उमटले आहेत. हा नरसंहार असून, शेतकर्‍यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग-ेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. समाजवादी पक्ष, राजदसह अन्य पक्षांनीही या घटनेवरून भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. या घटनेनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत रविवारी गाझीपूरहून लखीमपूर खेरीकडे गेले.

आज, सोमवारी देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात येतील, अशी घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली. या घटनेची उत्तर प्रदेश प्रशासनाकडून नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. काँग-ेसनेही या घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!