महिला क्रिकेट :आयरलँडच्या विरुध्द ऐतिहासीक एकदिवशीय सामन्यांची यजमानी करण्यासाठी झिम्बाब्वे तयार

हरारे,

झिम्बाब्वेचा महिला क्रिकेट संघ मंगळवार पासून येथील हरारे स्पोर्ट क्लबमध्ये आयरलँड विरुध्द खेळण्यात येणार्‍या चार सामन्यांच्या ऐतिहासीक एकदिवशीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी तयार आहे.

दोनी संघासाठी पहिला सामना ही एक महत्वपूर्ण संधी असेल. 2018 मध्ये न्यूझीलँंंड विरुध्दच्या एकदिवशीय सामन्याच्या मालिकेनंतर आयरलँड संघाचा हा पहिलाच एकदिवशीय सामना असेल. याच बरोबर या वर्षी एप्रिलमध्ये अधिकृत एकदिवशीय संघाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर आयरलँडचा हा पहिलाच सामना असेल. दोनीही संघातील हा सामना काटयाची टक्करपेक्षा कमी असणार नाही.

झिम्बाब्वेच्या संघाने सप्टेंबरमध्ये झालेल्या आयसीसी टि-20 महिला विश्व कप अफ्रिका क्वालीफायर्समध्ये एकही सामना हरला नव्हता. तर आयरलँडच्या संघाने आयसीसी टि-20 महिला विश्व कपसाठी यूरोप क्षेत्र क्वालीफायरमध्ये चारपैकी तीन सामने जिंकले होते व तो दुसर्‍या स्थानी राहिला होता.

दोनीही संघ सध्या शानदार फॉर्ममध्ये असून यामुळे ही मालिका खूप रोमांचक होणार आहे. दोनीही संघातील मालिकेचा कार्यक्रम पुढील प्रमाणे.

5 ऑक्टोंबरला पहिला एक दिवशीय सामना हरारे स्पोर्टस क्लब, दुसरा 7 ऑक्टोंबरला हरारे स्पोर्टस क्लब, तिसरा सामना 9 ऑक्टोबरला हरारे स्पोर्टस क्लब आणि चौथा सामना 11 ऑक्टोंबरला हरारे स्पोर्टस क्लबला खेळला जाईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!