पेनला इंग्लंड खेळाडूंच्या प्रती कोणतीही सहानुभूती नाही – हुसैन
लंडन,
ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी संघाचा कर्णधार टिम पेनला इंग्लंडच्या खेळाडू प्रति कोणतीही सहानुभूती नाही परंतु मला जोए रुटच्या संघावर गर्व वाटत आहे कारण त्यांनी आपले मनोबल उच्च ठेवले आणि आपल्या कसोटी कटिबध्दतेचा सन्मान केला आहे असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैनने व्यक्त केले.
हुसैनने डेली मेलसाठी लिहिलेल्या आपल्या कॉलममध्ये म्हटले की आता असे वाटत आहे की इंग्लंडच्या कसोटी खेळाडूना अॅशेज मालिकेसाठी क्वारंटीन बाबत त्यांच्या दृष्टीकेणा बाबत विशेष करुन ऑस्ट्रेलियावर खूप टिका होत आहे. मार्च 2020 मध्ये महामारीच्या सुरुवाती पासून इंग्लंडने 18 कसोटी सामने खेळले आहेत आणि इतर कोणाच्याही तुलनेत पाचने अधिक आहेत तर ऑस्ट्रेलियापेक्षा 14 जास्त आहेत.
त्याने म्हटले की ज्या प्रकारे इंग्लंडच्या कसोटी संघाने मुश्किल स्थितीमध्ये आपल्याला पुढे नेले आणि आपल्या कुटुंबा पासून दूर काळ घालविला आहे यावर मला खूप गर्व आहे. यामुळे मानसिक स्वास्थ्य प्रभावित झाले आहे.
हुसैनने म्हटले की ऑस्ट्रेलियामध्ये लोक इंग्लंडच्या खेळाडूना लेक्चर देत आहेत आणि त्यांना अॅशेज मालिकेच्या दरम्यान कठिण क्वारंटीनचा स्वीकार करण्यासाठी सांगत आहेत. ऑस्ट्रेलियातील लोकांनी इंग्लंडच्या खेळाडूना लेक्चर देण्यास सुरुवात केली आहे आणि म्हणत आहेत की त्यांनी यासाठी हो म्हणावे. तर नुकतेचे ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार पेनने जे मत मांडले आहे तर मला यामध्ये सहानुभूती दिसून आली.
पेनने नुकतेच इंग्लंंडच्या खेळाडूंवर टिपणी करत म्हटले होते की कोणीही त्यांना अॅशेज मालिकेत खेळण्यासाठी मजबूर करत नाहीत.
हुसैनने म्हटले की घराच्या बाहेर अॅशेज सारख्या मालिकेत देशाचे प्रतिनिधीत्व करणे कोणत्याही व्यवसायीक क्रिकेटरसाठी सन्मानाची गोष्ट आहे. काही खेळाडूंनी आयपीएलमध्ये भाग घेऊन स्वत:वर अतिरीक्त ओझे वाढविले आहे. जो पर्यंत आपण बबलमध्ये स्वत: राहत नाहीत तो पर्यंत दुसर्याला लेक्चर देऊ शकत नाहीत की त्यांना कशा प्रकारचा व्यवहार करायचा आहे.