मनु भाकरने ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अजून दोन सुवर्ण जिंकले,. भारताला आता पर्यंत चार सुवर्ण पदके
मुंबई,
भारताची निशानेबाज मनु भाकरने पेरुतील लीमामध्ये सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय निशानेबाजी क्रीडा महासंघ (आयएसएसएफ) ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आपल्या पदक तालिकेत अजून दोन सुवर्ण सामिल केले आहे. भारताने आता पर्यंत चार सुवर्ण व दोन रौप्य पदके जिंकली आहेत.
भारताने मिश्रीत, महिला आणि पुरुष संघ स्पर्धा बरोबरच 10 मीटर एअर रायफल पुरुष संघाने सुवर्णसह 10 मीटर एयर पिस्टल पदक स्पर्धेत सहा सुवर्ण, सहा रौप्य आणि दोन कांस्य पदकासह दिवसचा शेवट केला. अमेरिकेने चार सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्य पदकांसह दुसरे स्थान मिळविले आहे.
नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) ने एका प्रसिध्द निवेदनात म्हटले की मनु अजून दोन सुवर्ण जिंकून भारतीय प्रदर्शनाच्या केंद्रस्थानी होती. तिच्याकडे आता चॅम्पियनशिपमध्ये एकूण तीन सुवर्ण आहेत. सरबजोत सिंह बरोबर एयर पिस्टल मिक्स्ड संघात सुवर्णसाठी भागेदारी केल्यानंतर तिने रिदम सांगवान आणि शिखा नरवाल बरोबर मिळून 10 मीटर एअर पिस्टल महिला संघात स्पर्धा जिंकली.
पुरुषांच्या एयर पिस्टल संघाने नवीन, सरबजोत सिंह आणि शिवा नरवाल बरोबर सुवर्ण पदक जिंकले आणि त्यांना बेलारुसच्या पुरुष संघाने 16-14 ने हरविले. पहिल्या दिवशी ज्युनियर पुरुष 10 मीटर एयर रायफल संघाने सुवर्ण पदक जिंकले होते.