रोमहर्षक सामन्यात पंजाबला नमवत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेऑॅफमध्ये, वाचा कोणी फिरवली मॅच
शारजा,
शारजामध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल 2021 च्या 48 व्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पंजाब किंग्जचा अत्यंत रोमांचक सामन्यात सहा धावांनी पराभव केला. या विजयासह कोहलीच्या संघाने प्ले ऑॅफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. 12 सामन्यांत आरसीबीचा हा आठवा विजय आहे. तो 16 गुणांसह गुणतालिकेत तिसर्या क्रमांकावर आहे.
बेंगळुरूकडून 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सने सलामीवीर मयांक अग-वाल आणि कर्णधार केएल राहुल यांनी शानदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. यावेळी, असे वाटत होते की पंजाब संघ हा सामना सहज जिंकेल. परंतु, त्यांच्या मधल्या फळीतील खेळाडूंनी पुन्हा एकदा निराशा केली, ज्यामुळे संघाला सहा धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
पंजाबकडून मयांक अग-वालने सर्वाधिक 57 धावा केल्या. त्याने आपल्या अर्धशतकी खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले. याशिवाय केएल राहुलने 39 आणि अॅडम मार्क्रामने 20 धावा केल्या. त्याचवेळी निकोलस पूरन 03, सरफराज खान 00 आणि शाहरुख खान 16 धावांवर बाद झाले. सरतेशेवटी, मोईसेस हेनरिक्स 9 चेंडूत 12 धावा आणि हरप्रीत ब-ार दोन चेंडू 3 धावांवर नाबाद परतले.
युझवेंद्र चहलने पुन्हा एकदा बेंगळुरूसाठी सामना जिंकण्याची कामगिरी केली. त्याने आपल्या चार षटकांत 29 धावा देऊन तीन विकेटस घेतल्या. याशिवाय शाहबाज अहमद आणि जॉर्ज गार्टन यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकल्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांनी आरसीबीला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. आरसीबीची पहिली विकेट कोहलीच्या रूपात पडली. त्याने 24 चेंडूत एक षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या. यानंतर आरसीबीचा डाव अचानक ढासळला आणि त्यांनी दुसरी विकेट 68 वर आणि नंतर तिसरी विकेट 73 धावांवर गमावली. पहिल्यांदा डॅनियल ख्रिश्चन 00 आणि नंतर देवदत्त पॅडकिल 40 धावांवर बाद झाला.
पहिल्या सहा षटकांत कोणत्याही विकेटशिवाय 54 धावा करणार्या आरसीबीने 12 व्या षटकात केवळ 73 धावांवर तीन महत्त्वाच्या विकेट गमावल्या होत्या. यानंतर ग्लेन मॅक्सवेलने पंजाबच्या गोलंदाजांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. त्याने फक्त 33 चेंडूत 57 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या फलंदाजीतून तीन चौकार आणि चार षटकार आले. दुसर्या हाफमध्ये मॅक्सवेलचे हे तिसरे अर्धशतक आहे. त्याचबरोबर एबी डिव्हिलियर्सने 18 चेंडूत 23 धावा केल्या. एबीच्या बॅटमधून एक चौकार आणि दोन षटकार आले. शेवटच्या दोन षटकांत आरसीबीला पुन्हा गळती लागली. या दरम्यान मॅक्सवेल 57, एबी 23, शाहबाज अहमद 08 आणि जॉर्ज गार्टन 00 धावांवर बाद झाला. त्याचवेळी हर्षल पटेल 01 आणि केएस भरत 00 वर नाबाद परतला.
पंजाब किंग्जसाठी मोईसेस हेनरिक्सने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकांत फक्त 12 धावा देऊन तीन विकेटस घेतल्या. तसेच मोहम्मद शमीने 39 धावांत तीन बळी घेतले. त्याचबरोबर हरप्रीत बराराने अत्यंत किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत फक्त 26 धावा दिल्या.