’कॅप्टन कूल’ धोनीने सांगितलं राजस्थान विरुद्धच्या पराभवाचं कारण, म्हणाला…
मुंबई,
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 47 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नईच्या किंग्सचा पराभव केला. चेन्नईने राजस्थानला ॠतुराज गायकवाडच्या शतकी खेळीच्या जोरावर विजयासाठी 190 धावांचे आव्हान दिलं होतं. राजस्थानने हे आव्हान 3 विकेटसच्या मोबदल्यात 17.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पराभवाचं कारण सांगितलं. तसेच शतकवीर ॠतुराजचंही कौतुक केलं. धोनी काय म्हणाला?
ठनाणेफेकीचा कौल आमच्या बाजूने लागला नाही, हे आमच्यासाठी वाईट होतं. विजयासाठी दिलेलं 190 धावांचं हे परफेक्ट होतं. पण दवामुळे खेळपट्टीवर परिणाम झाला. यामुळे चेंडू बॅटवर सहजपणे येत होता. अशा वेळेस चांगल्या पद्धतीने बॅटिंग करण्याची आवश्यकता होती. राजस्थानच्या फलंदाजाने अचूकपणे बॅटिंग करत गोलंदाजांवर दबाव बनवला. राजस्थाने पहिल्या 6 ओव्हरमध्येच आम्हाला पछाडलं होतं‘, असं धोनीने सामना संपल्यानंतर म्हंटलं.
ॠतुराजचं कौतुक
ॠतुराजने राजस्थान विरुद्धच्या या सामन्यात शेवटच्या चेंडूवर सिक्स ठोकत शतक पूर्ण केलं. या खेळीसाठी धोनीने ॠतुराजचं कौतुक केलं. ‘राजस्थानचे फिरकी गोलंदाजी करत होते तेव्हा चेंडू थांबून थांबून येत होता. त्यानंतर चेंडू बरोबर येत होता. ॠुतुराजने अफलातून फलंदाजी केली. जेव्हा सामन्यात पराभव होतो, तेव्हा अशा शतकी खेळींकडे आपोआप दुर्लक्ष होतं. मात्र ॠुतुराजची शानदार खेळी केली, असं धोनीने नमूद केलं.‘