भारताचा पहिला डाव 241 धावांवर घोषित; भारताला 136 धावांची आघाडी

गोल्ड कोस्ट,

भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑॅस्ट्रेलियाला संघाला त्यांच्याच देशात गुडघे टेकण्यास भाग पाडले. गोल कोस्टमध्ये खेळवण्यात येत असलेल्या एकमात्र डे नाइट कसोटी सामन्यात भारताने पहिला डाव 377 धावांवर घोषित केला. यानंतर यजमान ऑॅस्ट्रेलिया संघाने 9 बाद 241 धावांवर आपला पहिला डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. भारताला पहिल्या डावात 136 धावांची आघाडी मिळाली आहे. दरम्यान, आज रविवारी या कसोटी सामन्याचा चौथा आणि अखेरचा दिवस आहे.

भारतीय महिला संघाने शानदार खेळ दाखवत यजमान ऑॅस्ट्रेलिया संघाला चौथ्या दिवशी 241 धावांवर आपला डाव घोषित करण्यास भाग पाडले. भारताकडून पूजा वस्त्राकार हिने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर अनुभवी झूलन गोस्वामी, मेघना सिंह आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. ऑॅस्ट्रेलियाकडून एलिस पेरीने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. तर ए गार्डनरने 51 धावांचे योगदान दिले.

भारताने प्रथम फलंदाजी करताना 145 षटकात 8 बाद 377 धावा केल्या. यात सलामीवीर स्मृती मंधानाने 216 चेंडूत 22 चौकार आणि 1 षटकारासह 127 धावांची खेळी केली. याशिवाय दीप्ती शर्माने 66 धावांचे योगदान दिले. पूनम राऊत (36) आणि मिताली राजने 30 धावा केल्या. तर शफलीने 31 धावांची खेळी साकारली.

30 सप्टेंबर ते 3 ऑॅक्टोबर या दरम्यान खेळवण्यात येत असलेल्या या कसोटी सामन्याचा आज रविवारी अखेरचा दिवस आहे. यामुळे ऑॅस्ट्रेलियाने आपला डावा 9 बाद 241 धावांवर घोषित करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ही कसोटी अनिर्णीत अवस्थेकडे झुकली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!