दुटप्पी भूमिका मांडणे व आतुन कीर्तन बाहेरून तमाशा असे गलिच्छ राजकारण न करण्याचे जि. प.सदस्य नंदकिशोर महाजन यांना बहुजन समाज पार्टी चे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप सपकाळे यांचे खुले पत्राद्वारे आव्हान.!

ऐनपुर प्रतिनिधी – ( विजय एस अवसरमल )

दुटप्पी भूमिका मांडणे व आतुन कीर्तन बाहेरून तमाशा असे गलिच्छ राजकारण न करण्याचे जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन यांना बहुजन समाज पार्टी चे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप सपकाळे यांचे खुले पत्र
सविस्तर वृत्त असे की जि.प.जळगाव येथे पंचायत राज कमेटी आली असता नंदकिशोर महाजन यांनी निवेदन देवून दलीत वस्ती सुधार योजना ई-टेंडर प्रक्रियेत अनियमितता बाबत रावेर तालुक्यातील सरपंचांचा दोष नाही त्यामुळे त्यांचेवर कार्यवाही करण्यात येऊ नये अशी मागणी केल्याची बातमी दि.२८/०९/२०२१ रोजी वर्तमान पत्रात वाचण्यात आली नंदकिशोर महाजन यांनी दि.१६/०७/२०२१ रोजी जि.प.जळगाव येथे सर्वसाधारण सभेत सन २०२०/२०२१ या वित्तीय वर्षात मंजूर फक्त रावेर तालुक्यातील व फक्त दलीत वस्ती सुधार योजना कामांच्या ई टेंडर प्रक्रियेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती दि.२०/०७/२०२१ रोजी सार्वजनिक सुट्टी असताना सुद्धा जि.प.च्या वरीष्ठ अधिकार्यांची समिती रावेर पंचायत समिती मध्ये येऊन १२ ते१३ तास चौकशी करून ताबडतोब पत्रकारांना प्रतिक्रिया दिली व येत्या दोन दिवसांत चौकशी समिती चा अहवाल प्रसिद्ध होईल व दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल सदर चौकशी समितीने दि.२०/०७/२०२१ ते २०/०८/२०२१ पर्यंत अहवाल प्रसिद्ध केला नाही अहवाल प्रसिद्ध करण्याकरिता प्रशासनास पत्र व्यवहार केलेला नाही एवढ्या तातडीने चौकशी ची मागणी करून दोन दिवसांत कारवाई होईल मात्र महिन्यात काहीच होत नाही याचे फक्त एकच उत्तर आहे की दलीत वस्त्यांचा विकास थांबला पाहिजे दलीतांच्या मुलांना अंगणवाडी,समाज मंदिर,चांगले रस्ते मिळता कामा नयेत दलीत वस्तीत घाणपाणी साचायला पाहीजेत रोगराई वाढली पाहिजे त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळायला नको अशीच आपली इच्छा होती म्हणून मागिल तिन महिन्यात दलीत वस्तीत सर्व कामे थांबलेली आहेत व भविष्यात सदर कामे केव्हा सुरू होतील याचे उत्तर कोणीच देत नाही काही दिवसांनी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत तेव्हा आचारसंहितेचे कारणं देऊन दलीत वस्त्यांचा विकास कायमचा थांबविला जाईल यावरून दलीत विरोधी मानसिकता सिध्द होते रावेर तालुक्यातील नऊ संघटनांनी दलीत वस्ती चौकशी अहवाल प्रसिद्ध करायला भाग पाडले त्यामुळे दि.२०/०८/२०२१ रोजी अहवाल प्रसिद्ध करून ३४ गावांच्या ग्रामसेवक व सरपंचावर अनियमिततेचा ठपका ठेवून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याचे नमूद करण्यात आले मात्र दि.२०/०८/२०२१ ते २६/०९/२०२१ पर्यंत सरपंच व ग्रामसेवक यांना कारणे दाखवा नोटीस बजावताच सरपंचा विषयी प्रेम उफाळून आले व पंचायत राज समिती समोर दि.२७/०९/२०२१ रोजी सरपंच दोषी नसून जि.प.चे प्रशासकिय अधिकारी दोषी असल्याचे सांगितले मात्र मागील एक महीन्यात अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून प्रशासनास किंवा चौकशी समिती कडे या संबंधी पत्र व्यवहार करून सरपंच दोषी नाहीत असे सांगण्याचे धाडस का केले नाही? पंचायत राज समिती जिल्ह्यात येताच सरपंचा प्रती आपले प्रेम अचानक का उफाळून आले? हे गौडबंगाल काय आहे चौकशी ची मागणी तुम्ही च करायची व सरपंचावर कारवाई करायची नाही यावरून आपली दुटप्पी भूमिका स्पष्ट होते आगामी जि.प. निवडणुकीत आपला दारून पराभव होऊ शकतो या भितीनेच आपले दिड महीन्यानंतर प्रेम उफाळून आले व यामुळे अधिकार्याना बळीचे बकरे बनवल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो हा आपला गोड गैरसमज आहे याचे कारण असे की आपला हेतू फक्त जातीयवादी मानसिकतेतून दलीत वस्त्यांचा विकास थांबवायचा एवढाच होता आणि तो आपण साध्य केला हे मात्र नक्की आपण जिल्हयाचे नेते असताना जि.प.च्या सर्वच कामाच्या इ टेंडर प्रक्रियेची चौकशी ची मागणी न करता फक्त रावेर तालुक्यातील दलीत वस्तीच्याच कामाच्या चौकशी ची मागणी केली बाकी सर्व कामांमध्ये अनियमितता व भ्रष्टाचार होत नाही असे कसे म्हणू शकता दिड महीन्यापासून चौकशी समिती ने सरपंचा वर कारवाई चार ठपका ठेवला असताना अचानक पंचायत राज समिती येताच सरपंचा विषयी अतोनात ढोंगी प्रेम कसे उफाळून आले? दलीत वस्त्यांचा विकास थांबवून काय फायदा झाला?३४गावांच्या सरपंच व ग्रामसेवक यांना बळीचे बकरे बनवून काय साध्य केले ? पंचायत राज समिती समोर सरपंच दोषी नसून प्रशासकीय अधिकारी दोषी आहेत असे आज म्हणत आहेत मग प्रशासकीय अधिकार्याविरुध्द पंचायत राज समिती येण्याच्या अगोदर कारवाई ची मागणी का केली नाही? रावेर तालुक्यातील दलीत समाज , सर्व सरपंच, ग्रामसेवक यांच्या भावनेशी खेळ खेळू नका व दुटप्पी भूमिका घेवुन राजकारणाकरीता आतुन किर्तन बाहेरुन तमाशा करुन जातीयवादी मानसिकतेतून गलीच्छ राजकारण करु नका असे नंदकिशोर महाजन यांना खुले पत्रात बहुजन समाज पार्टी चे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप सपकाळे यांनी म्हटले आहे..

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!