ऐनपुर येथील तरुणाचे ताप्ती नदी पात्रात जलसमाधी आंदोलन….

ऐनपुर प्रतिनिधी- ( विजय एस अवसरमल )

ऐनपुर ता.रावेर येथील रहिवासी सुरेश माधव कोळी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या (दि.१५/८/२०२१) रोजी ठेवलेल्या जलसमाधी आंदोलन स्थगित केले होते हे जलसमाधी आंदोलन दि.०४/१०/२०२१ रोजी करण्यात येणार आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथील सुरेश माधव कोळी हे दि.१५/०८/२०२१ रोजी ऐनपुर येथील सुस्ती येथे जिवंत जलसमाधी आंदोलन करणार होते परंतु पुनर्वसन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी लेखी पत्र दिल्यावर हे जलसमाधी आंदोलन ४५ दिवसा करीता स्थगित करण्यात आले होते परंतु आजपर्यंत पुनर्वसन अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी सो.,म.मुख्यकार्यकारीअधिकारी जि.प.जळगाव, तहसीलदार सो.रावेर म.गटविकास अधिकारी सो.रावेर हे अधिकारी आपले कर्तव्य बजावताना कसुर करीत असताना दिसत आहे सर्व अधिकारी कार्यवाही करण्यात टाळाटाळ करीत आहे जो पर्यंत सुरेश माधव कोळी यांच्या आजोबा च्या नावे असलेला भुखंड त्यांना मिळणार नाही, जिल्हाधिकारी सो.यांचा बेघरांना भुखंड जागा वाटप आदेश २०१८ला झालेला असून आजपर्यंत त्यांना जागा वाटप करण्यात आली नाही, राष्ट्रीय पेयजल योजना रखडली आहे पेयजल समिती वर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा, पुनर्वसन टप्पा क्र.२ मधील खुल्या भुखंडावर बांधण्यात आलेले व्यापारी संकुल जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेताच अवैध बांधकाम करण्यात आले आहे ती जागा मोकळी करण्यात यावी या बाबतीत अधिकारी यांना पत्र दिलेले असुन सुद्धा अधिकारी याकडे लक्ष दिले जात नाही म्हणून सुरेश माधव कोळी हे दि.१५/०८/२०२१ रोजी चे स्थगित झालेले जलसमाधी आंदोलन दि.०४/१०/२०२१ रोजी ऐनपुर येथील सुस्ती परीसरात ताप्ती नदीपात्रात सकाळी ११वा.जिवंत जलसमाधी आंदोलन करणार आहेत याबाबत सुरेश माधव कोळी यांनी जिल्हा अधिकारी कार्यालय येथे निवेदन दिले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!