बोल्ड अभिनेत्री मौनी रॉय ’या’ व्यक्तीसोबत अडकणार विवाहबंधनात, तारीख ठरली

मुंबई

आपल्या मादक आणि बोल्ड अदांनी सतत चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणार्‍या अभिनेत्री मौनी रॉय हिनं तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं कळत आहे. जीवनात प्रेमाची परिभाषा पटवून देणार्‍या खास व्यक्तीसोबत म्हणजेच प्रियकरासोबत मौनी एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार सूरज नाम्बियार असं तिच्या प्रियकराचं नाव आहे. मागील बर्‍याच काळापासून मौनी आणि त्याच्या नात्यानं सर्वांच्या नजरा वळवल्या होत्या. त्यांचा विवाहसोहळा इटली किंवा दुबई या दोनपैकी एका ठिकाणी होणार असल्याचं सांगितलं.

पश्चिम बंगालमधील कूच बेहर या भागाती मूळ रहिवासी असणारी मौनी तिच्या या ठिकाणीसुद्धा एका पार्टीचं आयोजन करणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच मौनीच्या आईनं तिची मैत्रीण मंदिरा बेदी हिच्या घरी सूरजच्या आईवडिलांची भेट घेतली होती. मौनीच्या भावाकडून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी 2022 मध्ये तिचा आणि सूरजचा विवाहसोहळा पार पडेल.

इतर सेलिबि-टींप्रमाणे सूरज आणि मौनी हेसुद्धा त्यांच्या लग्नासाठी एखाद्या सुंदर डेस्टिनेशनला प्राधान्य देताना दिसत आहेत. सूरज एक बँकर असून, तो व्यावसायिकही आहे. बंगळुरूतील एका जैन कुटुंबात त्याचा जन्म झाल्याचं सांगण्यात येतं. गेल्या बर्‍याच काळापासून हे दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यामुळं आता चाहत्यांना या लग्नाची उत्सुकता लागून राहणं हे मात्र स्वाभाविक आहे, असं म्हणायला हरकत नाही.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!