भारतीय जनता पक्षाने गांधी जयंतीनिमित्त गांधी विचारांचा प्रसार करण्याच्या जाहिर केलेल्या कार्यक्रमावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी टि्वटरवर दिलेली प्रतिक्रिया
मुंबई,
गांधी हत्येनंतर मिठाया वाटणारे म्हणे गांधींचा विचार पोहोचवणार. मुंहमें गांधी बगलमें गोडसे! हेडगेवार जेलमध्ये जाऊन संघविचाराचाच प्रसार करत होते तोच हा प्रकार! गांधीचा मुखवटा घालून गांधींचा विचार संपवण्याच्या संघाच्या षडयंत्राचा हा भाग आहे.गोडसे स्वयंसेवक होता हे देश विसरणार नाही
गांधीचे नाव केवळ स्वच्छतेशी न जोडता मनातील द्वेष, तिरस्कार संपवा. गांधींनी मनाची स्वच्छता ही महत्त्वाची मानली होती म्हणून ते देश स्वतंत्र होत असताना नौखालीत होते. गोळवलकर, उपाध्याय यांच्या लिखाणाचे दहन करा. गोरी मारो सालोंको म्हणणार्यांना व लिंचिंग करणार्यांचा सत्कार करणार्यांना
पक्षातून काढा. दंगेखोरांना शासन करा.
गांधी हत्या ही संविधानाची निर्मिती होत होती म्हणून झाली. त्या संविधानाला विरोध करणारे मनुस्मृती चे समर्थक कोण होते हे देश जाणतो.
पाच का पचीस आणि दिमक म्हणणार्यांचा पक्ष तोंडाने महात्मा बोलेल पण वर्षानुवर्षे त्यांना दुष्टात्माच ठरवत आलेला आहे.