सप्टेंबर 2021 अखेरचे मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ई-आर 1 सादर करण्याचे आवाहन
जालना,
सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासन यांची सर्व कार्यालये,अंगिकृत उद्योग, व्यवसाय ,महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद , पंचायत समिती, महानगर पालिका, नगरपालिका, तसेच खाजगी क्षेत्रातील किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार , व्यवसाय, कारखाने यांना सेवायोजन कार्यालये ,रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे, कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 नुसार त्रैमासिक विवरणरपत्र ई-आर 1 माहे सप्टेंबर 2021 तिमाही संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत (30 ऑक्टोंबरपंयर्ंत ) सादर करणे बंधनकारक आहे. या प्रमाणे नियोक्त्यांच्या लॉग-इन मध्ये विवरणपत्र ुुु.ीेक्षसरी.ारहरीुरूरा.र्सेीं.ळप या वेबपोर्टलवर ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या प्रमाणे नियोक्त्यांची सप्टेंबर 2021 या तिमाहीचे विवरणपत्र ई-आर 1 दि. 30 ऑक्टोबर 2021 पयर्ंत सादर करावे. यासाठी ुुु.ीेक्षसरी.ारहरीुरूरा.र्सेीं.ळप वेबसाईट ओपन करुन एम्प्लॉयर ( लीस्ट अ जॉब ) वर क्लीक करुन एम्प्लॉयर लॉग इनमध्ये नियोक्त्यांचा युजर आय डी व पासवर्ड वापरुन लॉग इन करुन ईआर रिपोर्ट मधील ई-आर 1 या ऑप्शनवर क्लीक करुन ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.
यासाठी काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार रोजी सार्वजनीक सुटया वगळून सकाळी 10.00 ते सांयकाळी 6.00 वाजेपर्यत (02482) 299033 या कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क करावा.
सेवायोजन कार्यालये (रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे) कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 मधील तरतुदी नुसार वरील प्रमाणे सर्व आस्थापनांनी 30 सप्टेंबर 2021 या अखेर आपल्या वेतन पटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाची माहीती ई-आर 1 विवरणपत्र 30 ऑक्टोंबर 2021 पुर्वी वरील वेबसाईटवर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे, यात कसूर झाल्यास कसूरदार आस्थापनांवर कायदेशिर कारवाई होऊ शकेल, याची नोंद घ्यावी असे संपत चाटे, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.