आयपीएल 2021 : मुंबई इंडियंसमध्ये अर्जुनच्या जागी सिमरजीत

अबु धाबी,

आयपीएलचा मागील विजेता मुंबई इंडियंसने यूएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएल-2021 च्या दुसर्‍या फेरीत दिल्लीचा वेगवान गोलंदाज सिमरजीत सिंहला आपल्या संघात सामिल केले आहे.

मुंबईचा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडूलकर जखमी झाल्याने त्यांच्या जागी सिमरजीतला संघात सामिल केले. संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करतो आहे.

मुंबई इंडियंसने निवेदनात म्हटले की मुंबई इंडियंसने आपल्या आयपीएल 2021 हंगामातील उर्वरीत सामन्यासाठी जखमी अर्जुन तेंडुलकरच्या जागी बदली खेळाडूच्या रुपात सिमरजीत सिहला सामिल केले आहे. मध्यम वेगवान गोलंदाज सिमरजीत आयपीएलच्या दिशानिर्देशानुसार अनिवार्य क्वारंटीनला पूर्ण केल्यानंतर संघा बरोबर सराव सुरु करेल.

23 वर्षीय सिमरजीतचा आयपीएलचा हा पहिलाच कार्यकाळ असेल. त्याने सप्टेंबर 2018 मध्ये दिल्लीसाठी लिस्ट-एमध्ये पदर्पण केले तर त्याच्या प्रथम श्रेणीची सुरुवात दोन महिन्यानंतर झाली. एक वर्षानंतर त्याने दिल्लीसाठी आपला पहिला टि-20 सामना खेळला. त्याने दिल्लीसाठी आता पर्यंत 10 प्रथम श्रेणी, 19 लिस्ट ए आणि 15 टि-20 सामने खेळले आहेत.

त्याने आता पर्यंत प्रथम श्रेणीत 37, लिस्ट ए मध्ये 19 आणि टि-20 मध्ये 18 गडी बाद केले आहे. तो या वर्षी जुलैमध्ये श्रीलकेमध्ये भारतीय संघाच्या पांढर्‍या चेंडूच्या दौर्‍यासाठी पाच नेट गोलंदाजामध्ये सामिल होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!