कुंडलिका नदी पुल नवनिर्मीतीसाठी शुक्रवारी जलसमाधी आंदोलन!

रासप नेते ओमप्रकाश चितळकर यांचा इशारा

जालना,

जालना शहरालगत असलेल्या कुंडलिका नदी वरील पुलाची नवनिर्मीती करण्यास प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाई च्या निषेधार्थ शुक्रवारी ( ता. 01) जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा रासप चे जिल्हा संपर्क प्रमुख ओमप्रकाश चितळकर यांनी दिला आहे.

या संदर्भात बुधवारी ( ता. 29) ओमप्रकाश चितळकर यांच्या नेतृत्वाखाली रासप च्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जालना- घनसावंगी रस्त्यावरील रोहनवाडी नजीक असलेल्या कुंडलिका नदीवरील पुलाची तात्काळ नवनिर्मीती करावी यासाठी रासपतर्फे पावसाळ्यापूर्वी निवेदन दिले होते. शिवाय जीवितहानी टाळण्यासाठी वेळोवेळी स्मरणपत्रे ही दिली. परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. असे लेखी निवेदनात नमूद करण्यात आले. परिणामी येथे जीवीत हानी झाली. शिवाय शंभर गावांचा संपर्क तुटला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, आरोग्य, शेतमाल वाहतूक यास अनंत अडचणी येत आहेत. या बाबी वेळोवेळी निदर्शनास आणून दिल्या नंतर ही दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी ( ता. 01)सकाळी 10.30 च्या सुमारास रासप तर्फे जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा ओमप्रकाश चितळकर यांनी लेखी निवेदनात दिला . निवेदनावर ओमप्रकाश चितळकर, अ‍ॅड. श्रीराम हुसे, अ‍ॅड संभाजी चुनखडे, अ‍ॅड शीतल खांडेभराड यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!