जायकवाडी धरणातुन गोदावरी नदी पात्रात विसर्ग नदीकाठच्या गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा

जालना,

जायकवाडी प्रकल्प,पैठण धरणामध्ये एकुण पाणीसाठा 94.29 टक्के असुन दि.29 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजेपासुन धरणातुन 9 हजार 432 क्युसेस विसर्ग गोदावरी पात्रात चालु आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील सर्व नागरिकांनी सतर्क राहुन चालमालमत्ता,चिजवस्तु,वाहने, जनावरे ,पाळीव प्राणी व शेती औजारे आदी साधन सामुग्री सुरक्षित स्थळी हलविण्यात यावीत. तसेच धरणाच्या खालील नदी काठावरील नागरी भागामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने नदीपात्रात सोडण्यात येणार्‍या पूर विसर्गाबाबत इशार्‍याचे गांर्भीय लक्षात घेता नागरिकांच्या जिवित व मालमत्तेची हानी टाळण्यासाठी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उपजिल्हाधिकारी, जालना यांनी एका आदेशाद्वारे दिले आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!