इमारतीचा भाग कोसळून 3 वर्षांच्या नातवासह आजीचा मृत्यू
कोलकाता,
शहरातील गजबजलेल्या भागात एका इमारतीचा काही भाग कोसळून आजी-नातावाचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एकूण तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी पोलीस, एनडीआरएफचे जवान दाखल झाले असून, बचावकार्य अद्यापही सुरू आहे.
ढिगार्याखाली अडकलेल्यांना काढले बाहेर –
उत्तर कोलकत्यातील एहिरिटोला परिसरात ही दुर्घटना घडली. आज सकाळी येथील एका इमारतीचा काही भाग कोसळला. पावासामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या इमारतीच्या ढिगार्याखाली अनेक जण दबले होते. त्यातील बहुतांश लोकांना स्थानिक नागरिक आणि एनडीआरएफच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढले.
घटनेत एकूण तिघांचा मृत्यू –
यासंदर्भात माहिती देताना जोरावगान पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणाले, की या घटनेत 3 वर्षांचा मुलगा आणि त्याच्या आजीचा मृत्यू झाला आहे. ढिगार्याखालून काढले तेव्हा दोघे जिवंत होते. पण आरजी कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर मृत्यू झाला. ढिगार्याखालून काढलेल्या इतर चौघांवर याच रुग्णालयात उपचार सुरु आहेत.