बाडाहोती सेक्टरमध्ये 100 चिनी सैनिकांनी केली होती घुसखोरी? उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणतात…
चमोली,
सीमावादाबाबत भारताबरोबर चर्चेच्या फेर्या करणार्या चीनच्या अद्यापही कुरापती सुरू आहेत. चीनच्या सैनिकांनी भारतीय सीमेजवळ बाडाहोती क्षेत्राजवळ एक पुलाचे नुकसान केले आहे. 30 ऑॅगस्टला 100 चिनी सैनिकांनी प्रत्यक्ष ताबा रेषेचे उल्लंघन करून उत्तराखंडमधील बाडाहोती सेक्टरमध्ये घुसखोरी केल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर हे चिनी सैनिक काही तासानंतर परतले होते. त्याबाबत उत्तराखंड सरकारने अधिक माहिती नसल्याचे सांगितले आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींना चिनी सैनिकांच्या घुसखोरीबाबत विचारले असता त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचे म्हटले आहे. केवळ माध्यमांतून माहिती मिळाली आहे. एजन्सींचे काम आहे, ते आपले काम करत आहे, असे पुष्कर सिंह यांनी म्हटले आहे.
भारत-तिबेट सीमा पोलीस तैनात
भारत-तिबेट सीमा पोलिसाचे जवान बाडाहोती भागामध्ये तैनात आहेत. सुत्राच्या माहितीनुसार भारतीय सैनिकांनी रणनीतीच्या दृष्टीने या भागामध्ये गस्त घातली आहे. चिनी सैनिक हे भारतीय सीमेत आल्याबाबतची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पूर्व लडाखसह इतर भूभागामध्ये चीन व भारतामध्ये वाद असताना आणखी नव्या घुसखोरीच्या घटनेची चर्चा सुरू आहे.
चिनी सैनिकांची घुसखोरी ही सामान्य घटना नाही-
सुत्राच्या माहितीनुसार दोन्ही देशांची प्रत्यक्ष ताबारेषेबाबत भिन्न मते असल्याने बाडाहोतीसारख्या साधारण घटना घडत आहेत. मात्र, 30 ऑॅगस्टला सीमा रेषा ओलांडून 100 चिनी सैनिक हे देशात आल्याबाबत भारतीय अधिकार्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सुत्राच्या माहितीनुसार 30 ऑॅगस्टला बाडाहोती सेक्टरमधील चिनी सैनिकांची घुसखोरी ही सामान्य घटना नाही. कारण, सीमेवर दोन्ही देशांचे सैनिक गस्त घालत आहे. या भागात दोन्ही देशांचे 50 ते 60 हजार जवान तैनात आहेत.
दोन्ही देशांचे गस्त घालणारी पथके समोरासमोर येतात, तेव्हा तणावाची स्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीत वातावरण शांत होण्याच्या प्रक्रियेचे पालन केले जाते.
कोठे आहे बाडाहोती क्षेत्र?
नंदा देवी राष्ट्रीय उद्यानमध्ये बाडाहोती क्षेत्र आहे. अधिकार्यांच्या माहितीनुसार उत्तराखंडमध्ये नंदा देवी राष्ट्रीय उद्यानाच्या उत्तरेमध्ये 80 वर्ग किलोमीटचे चारागाह बाडाहोती क्षेत्र आहे. हे क्षेत्र उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील मिडिल सेक्टरमध्ये येणार्या तीन सीमा चौकींपैकी आहे. या ठिकाणी आयबीटीपीच्या जवानांनाही शस्त्रे घेऊन जाण्याची परवानगी नाही.