भारतीय हॉकीच्या वैभवाचे पुनरुज्जीवन
नवी दिल्ली,
ऑॅलिम्पिकमधील पदकांचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय हॉकी संघाला 41 वर्षे लागली. टोक्यो ऑॅलिम्पिक 2020 मध्ये दृढ निर्धार करुन ऐतिहासिक विजय संपादन करत भारतीय पुरुष हॉकी संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला. टोक्यो ऑॅलिम्पिकमधील कांस्य पदक हे केवळ पदक नव्हते, तर ते करोडो देशवासीयांच्या आशा आणि स्वप्नांचे द्योतक होते.
एक काळ असा होता, जेव्हा जागतिक हॉकीवर भारताने अक्षरश: राज्य केले होते. ऑॅलिंपिकमध्ये आठ वेळा सुवर्ण विजेतेपद मिळवणारा भारत गेल्या चार दशकांत बदललेल्या आधुनिक हॉकीशी जुळवून घेण्यात अपयशी ठरला. ?स्ट्रो टर्फचे आगमन आणि खेळाच्या नियमांमध्ये अचानक झालेले बदल यामुळे जागतिक हॉकी स्पर्धांमध्ये संघर्ष करताना भारतीय हॉकीला विजयपदाला गवसणी घालण्यात अपयश आले.
या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, फहा आत्मविश्वासयुक्त असा भारत, हा एक नवीन भारत आहे. हा एक असा ऐतिहासिक दिवस आहे, जो प्रत्येक भारतीयाच्या सदैव स्मरणात राहील. कांस्य पदक मायदेशी आणल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन!ङ्ग. यावेळी झालेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमादरम्यान संघातील सर्व सदस्यांनी त्यांची स्वाक्षरी केलेली एक हॉकी स्टिक पंतप्रधानांना भेटीदाखल दिली.