पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
नवी दिल्ली
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती गेल्या 24 तासात 1,02,22,525 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने भारताने 87 कोटी (87,07,08,636) मात्रांचा टप्पा पार केला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, 84,62,957 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत 26,030 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 3,29,58,002 झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 97.81म झाला आहे. मार्च 2020 पासूनचा रुग्ण बरे होण्याचा हा सर्वोच्च दर आहे.
केंद्र आणि राज्य सरकार केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 93 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्ण नोंदीचा कल कायम राहिला आहे.
गेल्या 24 तासात 18,795 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 201 दिवसांनंतर 20,000 पेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे.
देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,92,206 असून देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 0.87म आहे. तसेच ही रुग्णसंख्या गेल्या 192 दिवसातील निचांकी आहे.
देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 13,21,780 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 56.57 (56,57,30,031) कोटींहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.88म असून गेल्या 95 दिवसांपासून हा दर 3म पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.42म असून, गेले सलग 29 दिवस हा दर 3म पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 112 दिवस हा दर 5म पेक्षा कमी आहे.
इतर अपडेटस:-
केंद्र सरकारने आतापर्यंत 84.70 (84,70,41,325) कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा राज्येकेंद्रशासित प्रदेशांना (मोफत) आणि थेट राज्याद्वारे खरेदी प्रक्रियेच्या अर्थात सर्व स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत. 42.83 (42,83,200) लाखापेक्षा अधिक मात्रा पुरवठा प्रक्रीयेत आहेत. 4.75 होऊन अधिक (4,75,43,650) कोटी न वापरलेल्या उपयोगी मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.