पुन्हा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ
मुंबई
डिझेल सलग चौथ्या दिवशी तर पेट्रोलच्या दरांमध्ये 22 दिवसांनंतर वाढ झाली आहे. मागील चार दिवसांपासून सातत्याने डिझेलचे दर वाढत असून 22 दिवसांमध्ये पहिल्यांदाच पेट्रोलच्या दरांमध्येही वाढ करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलचे दर 25 पैशांनी वाढवले आहेत. तर पेट्रोलचे प्रतिलीटर मागे 20 पैशांनी वाढवण्यात आले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटरमागे 21 पैशांनी वाढलेत. मागील पाच दिवसांमध्ये डिझेलचे दर 95 पैशांनी वाढलेत.
पेट्रोल-डिझेलच्या दराने पुन्हा एकदा लोकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 रोजी देशात आज पुन्हा डिझेलचे दर वाढले आहेत. तर आज पेट्रोलच्या किंमतीही वाढल्या आहेत. गेल्या पाच दिवसांतील चौथी वाढ पाहायला मिळत आहे. डिझेलमध्ये आज 25 ते 27 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर देशभरातील शहरांमध्ये पेट्रोल 20 ते 22 पैशांनी महाग झाले आहे. जवळपास दोन महिन्यांनी पेट्रोलचे दर वाढले आहेत. यापूर्वी ऑॅईल मार्केटिंग कंपन्यांनी 24, 26 आणि 27 सप्टेंबरलाही डिझेलचे दर वाढवले होते.