सावदा येथे स्व. सुमन बाबुराव चौधरी बहूद्देशीय संस्थे तर्फे सरकारी कर्मचा-यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर उस्साहात ..आरोग्याची हेळसांड थांबवायची असेल तर वेळीच आरोग्य तपासणी करणे गरजेचे – मुख्याधिकारी किशोर चव्हाण..

सावदा प्रतिनिधी –

सावदा ता. रावेर येथे आज स्व. सुमन बाबुराव चौधरी बहूद्देशीय संस्थे तर्फे सरकारी कर्मचा-यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.

सविस्तर वृत्त असे कि, सावदा येथील ८ ते १० वर्षापासून कार्यरत असलेली स्व. सुमन बाबुराव चौधरी बहूद्देशीय संस्थे तर्फे आज सरकारी कर्मचा-यांसाठी सावदा येथील नगरपालिका पूरक सभागृह येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. सरकारी कर्मचारी यांनी कोरोना कालखंडात जनते साठी जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस खूप योगदान दिले. आम्ही त्या सरकारी कर्मचारी वर्गासाठी काही करावे असे खूप दिवसांपासून वाटत होते म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या हेतूने आम्ही आज हे शिबीर आयोजित केलेले आहे. यामध्ये सर्व नगरपालिका कर्मचारी, तसेच पत्रकार यांचा समावेश झाला. असे संस्थेच्या अध्यक्षा सारिका चौधरी म्हणाल्या.
शिबिरा दरम्यान सावदा नगरपालिका चे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी आरोग्य तपासणी साठी आलेले भुसावळ येथील राकेश एल. उदासी (डी.एम.एल.टी. न्यू दिल्ली) यांचे स्वागत केले. तर मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांचे स्वागत संस्थेच्या अध्यक्षा सारिका चौधरी यांनी केले. तसेच संस्थेचे सचिव राजेश चौधरी यांनी प्रशासकीय अधिकारी सचिन चोळके, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील यांचे सुधा स्वागत केले. आजच्या दगदगीच्या जीवनात आरोग्याची हेळसांड होत आहे. कोणीही आरोग्याकडे लक्ष देत नाही. आणि एक दिवस असा येतो कि आरोग्यासाठी चांगलीच किंमत मोजावी लागते, असे होऊ नये म्हणून वेळीच आपल्या
आरोग्य तपासणी करणे गरजेचे असल्याने सर्वांनी तपासणी करून घ्यावी, नोकरी म्हंटली कि टेन्शन हे येतच परंतु टेन्शन न घेता अगदी हसतमुखाने काम करत रहायचे. टेन्शन घेतल्यास तुमची शुगर कमी जास्त होत असते. असे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी सांगितले. सुमारे १०० कर्मचारी वर्ग व पत्रकार वर्गानी शिबिराचा लाभ घेतला. शिबिरा दरम्यान प्रत्येकाची शुगर (डायबिटीज) चेक करण्यात येऊन त्यांना लगेच रिपोर्ट देण्यात आले. शिबिर यशस्वी रित्या पार
पाडण्यासाठी नगरपालिकेचे करनिरीक्षक अनिल आहुजा व अरुण ठोसरे यांनी खूप परिश्रम घेतले. शिबिरात नगरपालिकेतील सर्व कर्मचार्यांनी सहभाग नोंदविला होता. तसेच शिबिरासाठी सर्वेश चौधरी, प्रेम पाटील, विशाल कदम, नगरपालिकेचे शिपाई शब्बीर तडवी यांनी सहकार्य केले. यापुढेही संस्थेद्वारे विविध समाजउपयोगी उपक्रम राबविले जातील, लवकरच लहान मुलामुलींसाठी संस्थेतर्फे लैंगिक अत्याचारा संबंधित एक दिवशीय शिबीर घेण्यात येईल. तसेच संस्थेतर्फे कॉम्पुटर प्रशिक्षणा साठी क्रिस्टल कॉम्पुटर, सुगंगा नगर, फैजपूर रोड, सावदा येथे दालन सुरु केले असून यात ३ वर्षा पासून ते अगदी वयोवृद्ध परेंत कॉम्पुटर प्रशिक्षणासाठी प्रवेश देणे सुरु आहे. असे संस्थेचे सचिव राजेश चौधरी यांनी सांगून आभार मानले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!