पुढील दोन/ तीन दिवस दुपारी ३ ते सायंकाळी ७ पर्यंत शेतात काम करू नका, प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन

बलवाड़ी‌‌ प्रतिनिधि ( आशिष चौधरी)

पुढील काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच या कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हयातील सर्व शेतकरी / नागरिक यांनी खबरदारी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे. पाऊस सुरू असताना शेतकऱ्यांनी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत शेतीची व इतर कामे करु नये, कारण सदर कालावधीमध्ये विजा पडण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली / पाण्याच्या स्त्रोताजवळ / विदयुत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वत: सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे….

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!