यमनच्या मारिबतील भिषण लढाईत 44 लोकांचा मृत्यू
सना,
युध्दग-स्त यमनमधील तेल समृध्द राज्य मारिबमध्ये सरकारी सैन्य दल आणि हौती बंडखोर यांच्यात सुरु असलेल्या भिषण संघर्षाच्या दरम्यान करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात कमीत कमी 44 लोक मारले गेल्याची माहिती सैन्याने दिली.
सैन्य अधिकार्याने रविवारी सांगितले की मागील 24 तासाच्या दरम्यान मारिबच्या लढाईत हौती बंडखोर समूहाचे 28 सदस्य आणि सरकार समर्थक यमन सैन्याचे 16 सैनिक मारले गेले.
त्यांनी म्हटले की हौती लढाकूनी मारिबच्या दक्षिण आणि उत्तर-पश्चिम भागामध्ये सरकार समर्थक दलांद्वारा नियंत्रीत अनेक ठिकाणांवर एकाच वेळी हल्ले केले. हौतीनी मारिबमध्ये तैनात सरकार समर्थक दलांला निशाना बनविण्यासाठी स्फोटकाने भरलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला.
त्यांनी म्हटले की सरकार समर्थक दला बरोबरील लढाईमध्ये अनेक बहुपक्षीय हल्ले सुरु केल्यानंतर हौती मर्यादीत जमिनी प्रगती मिळविण्यात यशस्वी राहिला.
अधिकार्यांनी सांगितले की सऊदी अरबच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या लढाऊ विमानानी हौती नियंत्रीत भाग आणि मारिबच्या पश्चिमी भागामध्ये सुदृढीकरणाला निशाना बनवत हवाई हल्ले केले.
हौतीने फेब-ुवारीमध्ये मारीबवर एक मोठे आक्रमण सुरु केले होते जे उत्तरमधील सरकारच्या अंतिम ठिकाणावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न होता.
यमनमधील गृहयुध्द 2014 च्या शेवटी सुरु झाले होते त्यावेळी इराण समर्थित हौती समुहाने देशाच्या उत्तर भागातील अधिकांशं भागांवर नियंत्रण मिळविले होते आणि राष्ट्रपती अब्द -रब्बू मंसूर हादीच्या आंतरराष्ट्रीयस्तरावर मान्यता प्राप्त सरकारला राजधानी सनाच्या बाहेर केले होते.