मुंबई इंडियंसच्या या संघात आक्रमकता दिसली नाही – जहिर खान
दुबई
मुंबई इंडियंस संघातील खेळाडूंमध्ये आता पर्यंत आक्रमक प्रवृत्तीला आपण पाहिले नसून संघाकडे आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आता जास्त वेळ उरलेला नाही असे मत मुंंबई इंडियंसच्या क्रिकेट ऑपरेशन निदेशक जहीर खानने व्यक्त केले.
आयपीएल स्पर्धेचा पाच वेळेचा विजेता मुंबई संघ यूएईमध्ये खेळण्यात येत असलेल्या या हंगामातील दुसर्या फेरीत सलग् तिसरा सामनाला हरला आहे.
जहिरने म्हटले की मला वाटते की आम्ही स्वत:ला पुढे नेत नाहीत. आपल्याकडे क्रिकेटमधील 40 चांगले षटके असले पाहिजे आणि क्रिकेटच्या सामन्याला जिंकण्यासाठी आपल्याला अशा 40 षटकांमध्ये चांगले क्रिकेट खेळावे लागेल. यासाठी आम्ही पॅचमध्ये चांगले खेळत राहिलो आहोत. परंतु वास्तवामध्ये याला कायम ठेवण्यात सक्षम नाहीत आणि आता पर्यंत आम्ही असे करु शकलो नाहीत.
त्याने म्हटले की काळ सतत पुढे जात आहे आणि खेळाडूंना यासाठी लवकरात लवकर लयमध्ये येण्याची जरुरी आहे. आमच्याकडे आता जास्त वेळ राहिलेला नाही आणि आम्हांला आता लवकरच गोष्टींना संभाळावे लागेल. आगामी सामन्यांमध्ये आम्हांला कोणत्याही स्थितीमध्ये विजय मिळवावा लागेल. संघातील सर्व खेळाडूनी एकजुट रहावे आणि सामने जिंकावे हे संघासाठी जरुरीचे आहे.
त्याने म्हटले की पुढे जाऊन हा संकल्प खूप महत्वपूर्ण होणारा आहे आणि आम्हांला विश्वास करावा लागेल. या संघाने भूतकाळात असे केलेले आहे. आम्ही हे करु शकत नाही असे कोणतेही कारण नाही. परंतु ज्या प्रकारे मुंबईला प्रभुत्व दाखविणे आणि क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जाते आहे क्रिकेटचे हे आक्रमक स्वभाव, आम्ही अजून पर्यंत पाहिलेले नाही.