आमडदे येथे साधनाई फाउंडेशन अंतर्गत भव्य आरोग्य शिबीर संपन्न

आमडदे – ( प्रतिनिधी )

कर्मवीर तातत्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या विसाव्या पुण्यस्मरणार्थ व नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साधनाई फाउंडेशन मार्फत भव्य आरोग्य शिबिर संपन्न झाले या आरोग्य शिबिराचे *उद्घाटन प्रशांत दादा पाटील डॉ. पुनमताई पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निळकंठ पाटील डॉ.तौसिफ खाटीक डॉ. प्रफुल्ल काबरा प्राचार्य आर आर वळखंडे सर डॉ टी एन भोसले डॉ एस वाय पाटील
सरपंच उज्ज्वला दिनानाथ पाटील , राजेंद्र न्यावबा पाटील, किशोर रघुनाथ भोसले, सुधाकर भावलाल पाटील ,उपसरपंच डॉ रावसाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील, विष्णू भोसले इ. उपस्थित होते.

यानंतर डॉ.पुनम ताई पाटील यांना नारीशक्ती पुरस्कार मिळाल्याने साधनाई फाउंडेशन तर्फे यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी वृंदावन हॉस्पिटल पाचोरा यांच्यातर्फे पाचशे नीडल व गोळ्या भेट देण्यात आल्या
या शिबिराला अंतर्गत पोटाचे विकार अपेंडिक्स हार्निया हायड्रोसिल अशा विविध आजारांची तपासणी करण्यात आली तसेच शरीरावरील सर्व प्रकारचे गाठी व हाडांचे सर्व प्रकारचे आजार ऑपरेशन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले या शिबिर अंतर्गत ४१५ रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला या शिबिरात प्रसंगी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस पी पाटील सर यांनी केले यावेळी शिबीर यशस्वीतेसाठी साधनाई फाउंडेशन चे कार्यकर्ते हरिष भोसले,दिपक भोसले सर, नितीन दत्तात्रय पाटील, पंकज योगिराज पाटील, लीलाधर पाटील पत्रकार दिनेश पाटील सर अमोल पाटील अमोल भोसले,संदिप पाटील, निंबाजी पाटील, सुनील पाटील सर , नंदू पाटील सर ,पंकज पाटील ,रमाकांत पाटील सर, दत्ता भोसले सर ,चंदू सर ,रमाकांत भोसले, विशाल पाटील सर ,उपसरपंच नरेंद्र पाटील चंद्रकांत पाटील ,दत्तात्रय भोसले सर, दीपक पाटील ,ग्रामपंचायत सदस्य विष्णू भोसले यासह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण भडगाव तालुक्यातील बातमी 9730002081 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
राजू दिक्षित
भडगाव तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9730002081

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!