पुढील महिन्यात 20 दिवस बँका बंद

नवी दिल्ली

अनेक सण-उत्सवांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असलेल्या आगामी ऑॅक्टोबर महिन्यात बँक कर्मचार्‍यांना सर्वाधिक सुट्टी मिळणार आहे. वेगवेगळ्या सण-उत्सवांमुळे मुंबईसह महाराष्ट्रात बँकांना 9 दिवस सुट्टी असेल. तर देशभरातील अनेक राज्यांतील बँकांना याच महिन्यात जवळपास 20 दिवस सुट्ट्या असणार आहेत.

सणासुदीमुळे महाराष्ट्रातील बँकाही अनेक दिवस बंद राहणार आहेत. तर अनेक ठिकाणी बँका आठवड्यातून फक्त एखाद – दुसर्‍या दिवशी उघडल्या जाणार आहेत. त्यामुळे बँकेशी संबंधित कामे लोकांना लवकर आटोपून घ्यावी लागतील.

देशभरातील सर्वच बँका 20 दिवस बंद राहणार नाहीत, याची नोंद घ्यावी. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने काही राज्यांसाठी प्रादेशिक सुट्ट्या निश्चित केल्या आहेत. त्यामुळे काही दिवस काही राज्यांमधील बँका बंद राहतील. निगोशिएबल इन्स्ट्रूूमेंटस कायद्यांतर्गत आरबीआयने ऑॅक्टोबर महिन्यातील सुट्ट्या निश्चित केल्या आहेत.

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. ऑॅक्टोबर महिन्यातील महाराष्ट्रातील बँकांच्या सुट्ट्यांविषयीची माहिती दिली आहे. या माहितीच्या आधारे बँकेशी संबंधित कामाचा निपटारा करावा लागेल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!