रोजगार हमी योजनेअंतर्गत शासनाच्या पैशावर मारला डल्ला…
अधिकारी व कर्मचारी मस्त शासन तिजोरी होत आहे फस्त..
दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील
वरणगाव-परिसरातील आचेगाव येथे ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भुसावळ तालुका मागासवर्गीय सेल अध्यक्ष जयराज पवार यांनी आपल्या गावातील होत असलेल्या भ्रष्टाचाराविषयी दैनिक महाराष्ट्र सारथी च्या माध्यमातून शासनापर्यंत संदेश जाऊन जनहित विषयी पारदर्शी चौकशी होत न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे
महाराष्ट्र सरकार हे नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत नागरिकांना मदतोपरी करण्याचा प्रयत्न करत असते
परंतु तसे न होता शासनाकडून आलेला पैसा हा आम नागरिकांपर्यंत न पोचता काही सरकारी अधिकारी व कर्मचारी संगणमत करत तो पैसा हडप करून स्वतःचा खिसा भरत आहे.
सरकारी पगार मिळत असताना सुद्धा ही अशा लोकांची मानसिकता ही शासनाकडून आलेला गरीब जनतेचा पैसा कसा पचवायचा यात ही लोक कागदपत्र फेरफार करत माहिर असतात
राज्याच्या लाचलुचपत विभागाच्या कार्यवाही नुसार महसूल खाते व पोलीस खात्यात भ्रष्टाचार हा शिखरावर आहे
भ्रष्टाचार हा थांबणार की नाही
शासन यात कठोर कायदे करणार का
आज घडीला भारत देशाची अवस्था ही
अवघड झाली असून भारत देशावर अब्जवधी चे कर्ज असून महाराष्ट्र सरकार वरही असलेले कर्ज हे वाढतच चाललेले आहे
याला नेमके जबाबदार कोण
लाच मागणारा की लाच देणारा
हे एक कोडेच आहे
भ्रष्टाचार हा असाच मार्गक्रमण करीत राहिला तर भारतदेश हा येत्या काही वर्षात जमीन कागदोपत्री सहित विकला जाणार हे मात्र नक्की.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
भारतातील केंद्रीय मंत्री ते राज्यातील मंत्री हे शपथ विधी घेतेवेळी वचन दिले जाते की इमाने इतबारे ने जनतेची सेवा करीन पण जनतेची सेवा थोडी थोडकी करत आधी मेवा खाण्याला काही मंत्री प्राधान्य देत स्वतःच्या व नातेवाईकांच्या तिजोऱ्या या भरण्यासाठी लक्ष दिले जाते
भ्रष्टाचारांनी बरबटलेल्या काही नगरसेवक आमदार खासदार मंत्री सरकारी अधिकारी कर्मचारी व्यापारी बिल्डर व्यवसायिकांची निर्देशक कलाकार कर बुडवे यांची निष्पक्ष उघडपणे चौकशी बसवल्यास अरबो खरबोची संपत्ती ही खणून काढली तर भारत देश त्या दिवशी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवेल.
✍🏻दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण आपल्या परिसरातील बातमी 95940 47437 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपण आपल्या नावाने बातमी दिल्यास आमच्या दैनिक मध्ये प्रसिद्धी केली जाईल.
आपला विश्वासू
प्रशांत पाटील
भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
95940 47437