रावेर पचायत समीती सभापती यांनी स्वतः दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन..
रावेर शहर प्रतिनीधी – : ( ईश्वर महाजन )
आज २४ सष्टेंबर रोजी रावेर पंचायत समीती सभापती सौ कविता हरलाल कोळी यांनी चक्क जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना स्वतः जाऊ दिले निवेदन निवेदनाद्वारे सविस्तर असे की गेल्या २७ मे २०२१ रोजी झालेल्या वादळी पाऊसात १९ गावाचे नुकसान झाले आहे त्यात ८७८ घराचे नुकसान झाले असुन आता पर्यन्त शासनाने कोणत्याही फक्त आश्वासनाचा पाऊस पाडून वेळ काढू भुमिका घेत आले आहे गेल्या दीड वर्षाच्या कोरोना काळात कामे नसल्याने अत्यंत जिकरी ने व संघर्षमय असे रावेर तालुक्यातील लोक जीवन जगत आहे त्यात असे अस्मांनी संकटात केळी पिकाचे विमा पण उतरविण्यात असमर्थता होती इतके भीषण परिस्थिती काही शेतकरी यांची झाली आहे त्यात घराचे पत्रे, काहीचे भिंती असे बरेच नुकसान झाल्याने अजुन भीषण संकटात सामोरे जात आहे तरी आपणास निवेदन देत आहोत पंधरा दिवसात आपण शासना जवळ पाठपुरावा करून न्याय मिळावा नाहीतर एक दिवसीय उपोषण करण्यात येईल त्या प्रसंगी सईबाई आत्माराम कोळी , सिद्धी दुर्गादास पाटील,
आशा बाई विनोद पाटील, कल्पना गुलाब पाटील व मनीषा जगदीश पाटील ह्या भगिनी निवेदन देताना हजर होत्या.
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832