विदेश व्यापार महासंचालनालय आणि नागपुर जिल्हा उद्योग केंद्राद्वारे 24 सप्टेंबर रोजी एक दिवसीय निर्यात संमेलनाचे आयोजन

नागपुर,

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वतीने देशभरात देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वाणिज्य सप्ताहाचे आयोजन केले जात असून याच श्रुखंलेत नागपुरच्या नवीन सचिवालय भवन स्थित विदेश व्यापार महासंचालनालय नागपुर मिहान विशेष आर्थिक क्षेत्र (सी.ई.झेड.) आणि राज्य शासनाच्या नागपुर जिल्हा उद्योग केंद्राद्वारे उद्या 24 सप्टेंबर 2021 शुक्रवार रोजी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन- व्हीआयएच्या उद्योग भवन सिवील लाईन्स्थित सभागृहामध्ये एक दिवसीय निर्यात संमेलनाचे आयोजन सकाळी 11 ते 2 या वेळेत करण्यात आले आहे. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आर.विमला उपस्थित राहणार आहेत.

या एक दिवसीय संमेलनादरम्यान नागपूर जिल्हा निर्यात कृती आराखडा विषयी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गजेंद्र भारती हे सादरीकरण करतील. विदर्भातील निर्यातिच्या संधी याविषयी वेद- विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष श्रीकुमार राव हे आपले विवेचन करतील. पहिल्या सत्रामध्ये नागपूर जिल्ह्यातील कृषी आणि खाद्यप्रक्रीया, तसेच अभियांत्रिकी वस्त्र स्टील या उद्योगातील निर्यातदारांचे चर्चासत्र उद्योग विभागाचे संयुक्त संचालक ए पी धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत होईल. नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील सर्व 11 जिल्ह्यातील निर्यातदार या कार्यक्रमामध्ये व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून जोडली जातील कृषी निर्यात विकास प्राधिकरणाच्या योजनाविषयी सुद्धा या संमेलनात माहिती दिली जाईल या कार्यक्रमाप्रसंगी कस्टम्स, मिहान, कॉनकॉर तसेच निर्यात सबंधित संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

वाणिज्य विभागाच्या वतीने 20 ते 26 सप्टेंबर 2021 या काळात ‘वाणिज्य सप्ताह’ (व्यापार आणि वाणिज्य सप्ताह) साजरा करण्यात येणार आहे. देशभरात अनेक कार्यक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे, ज्यामध्ये आत्मनिर्भर भारत हा केंद्रस्थानी आहे,

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!