केरळ भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रनना परत एकदा पोलिसांच्या समोर हजर होण्यास सांगितले

तिरुवपनंतपुरम,

केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के.सुरेंद्रनना पोलिसांनी स्वत: समक्ष हजर होण्यासाठी परत एकदा दुसरी नोटिस प्रसिध्द केली आहे. यात त्यांना त्या मोबाईल फोनसह परत एकदा हजर होण्यास सांगितले आहे ज्याबाबत सुरेंद्रनी दावा केला की तो मोबाईल हरवला आहे.

सुरेंद्रन याच्या एक आठवडया आधी एका निवडणुक लाच प्रकरणात कासरगोडा गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकार्‍या समोर हजर झाले होते.

पोलिस तपास पथकाचा दावा आहे की ज्या मोबाईल फोन बाबत त्यांनी हरविल्याची सूचना दिली होती त्याचा उपयोग सुरु आहे आणि यामुळे त्याना एक आठवडयाच्या आतामध्ये परत एकदा हजर होण्यास सांगितले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन आणि अन्य दोन स्थानिय भाजप नेत्यांच्या विरोधात तक्रार दिल्या गेल्यानंतर एका स्थानिय न्यायालयाने पोलिसांना निवडणुक आयोगाच्या नियमां अंतर्गत गुन्हा नोदविण्याचे निर्देश दिले होते. तक्रारीनुसार बसपा उमेदवार के.सुंदराना आपला उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी पैसे दिले गेले होते.

केरळ विधानसभा निवडणुकीत सुरेंद्रननी कोनी आणि मंजेश्वरम या दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवली होती मागील आठवडयात सुरेंद्रन 75 मिनिटापेक्षा अधिक काळा पर्यंत अधिकार्‍या बरोबर राहिले आणि सूत्रानुसार त्यानी सुंदराला ओळखण्यास नकार दिला.

त्यांनी सांगितले की माझ्या मनात देशातील कायद्याचे सर्वोच्च सन्मान आहे यासाठी मी तपास अधिका-या समोर आलो आहे.

या मतदारसंघातील माकपाचे उमेदवार व्हि.व्ही.रामेसन हे तिसर्‍या स्थानावर राहिले आणि ते तक्रारकर्ते आहे  कासरगोड प्रथम श्रेणी न्यायालयाने सुरेंद्रन आणि अन्य दोन भाजप नेत्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यास परवानगी दिली.

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी 2 मेला मतमोजणी झाली तर काँग-ेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ उमेदवार ए.के.एम.अशरफ यांनी सुरेंद्रनना 745 मतानी पराभूत केले होते.

संयोगाने सुंदराने मीडिया समोर उघडपणे स्वीकारले होते की निवडणुकीतून माघार घेण्यासाठी त्यांना 2.5 लाख रुपये आणि एक स्मार्टफोन दिला गेला होता. त्यांनी म्हटले की सुरेंद्रन जिंकले मला 15 लाख रुपये, कर्नाटकामध्ये एक घर आणि वाइन पॉलरचा प्रस्ताव दिला होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!