राज ठाकरे यांचा दौरा : मनसेची पोस्टरबाजी, पोलीस आयुक्तांचा इशारा

नाशिक

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौर्‍यावर आहेत. यानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी मनसेकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली. मात्र, विनापरवानगी लावण्यात आलेली राजकीय होर्डिंग्ज हटविण्यात आली. अशी कोणी राजकीय होर्डिंग्ज यापुढे लावली तर कारवाई होणारच, अशा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिला आहे. दरम्यान, त्यानंतर पोलीस आयुक्तांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. मनसेकडून लावण्यात आलेले होर्डिंग्ज काढून टाकण्यात आले होते. राज ठाकरे नाशिक दौर्‍यावर असताना मनसेने शहरभर बॅनर लावले होते. मात्र, पुन्हा मनसेने स्वागताचे बॅनर रात्रीतून झळकवले. मनसेने काल कारवाई वेळी रास्ता रोखण्याचा प्रयत्न देखील केला होता. बॅनरची परवानगी नसल्याने पालिका आणि पोलीस प्रशासनाने कारवाई करताना हे बॅनर हटविले होते.

मनसेचे नेते राज ठाकरे यांच्याशी झालेली भेट सौहार्दपूर्ण होती. महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून ही भेट घेतल्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले. राजकीय पक्ष कोणताही असो नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई होणारच, असे पोलीस आयुक्त पांडे यांनी सांगितले.

नाशिक शहरात कायदेशीर परवानगी घेतल्याशिवाय होल्डिंग लावू नये असे आवाहन करण्यात आले आहे. असे असताना मनसेने विनापरवानगी उभारलेले होर्डिंग महापालिकेने पोलिसांच्या बंदोबस्तात काढले होते. या कारवाईला प्रत्युत्तर देत देत मनसे पदाधिकार्‍यांनी आंदोलन केले होते.

तसेच आज सकाळी पुन्हा होर्डिंग लावून पोलिसांना आज थेट आव्हान दिले. परिणामी आज नाशिक पोलीस आयुक्त यनी राज ठाकरे यांची भेट घेत त्यांना शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार्य करण्याचे आवाहन केले. या भेटीत होर्डिंगबद्दल काहीही चर्चा त्यांनी केली नाही, असा दावा नाशिक पोलीस आयुक्तांनी केला. मात्र राजकीय पक्ष कुठलाही असो त्याच्यावर कारवाई केली जाणार हे सांगत नाशिक पोलीस आयुक्तांनी मनसेच्या पदाधिकार्‍यांना अप्रत्यक्ष संदेश दिला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!